जवळे दुमाले येथे दोन गटात हाणामारी 

 
crime

ढोकी  : आरोपी नामे-1) रत्नदिप जालिंदर टेकाळे, 2) संदीप जालिंदर टेकाळे, 3) जालिंदर टेकाळे तिघे रा. जवळे दु, ता. जि. उस्मानाबाद यांनी पिकाच्या काकऱ्या तुडवल्याचे कारणावरून दि.20.07.2023 रोजी सायंकाळी 18.00 वा. सु. जवळे दु शिवार येथे फिर्यादी नामे- मंगल अशोक घुटे वय 45, रा. सौंदाणा (ढोकी) ह.मु. जवळे दु ता. जि. उस्मानाबाद यांना व त्यांची आई यांना रत्नदिप टेकाळे, संदीप टेकाळे, जालिंदर टेकाळे  यांनी संगणमत करुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी काठीने मारहाण करुन उजवा हात फॅक्चर केला. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मंगल घुटे यांनी दि.22.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 326, 324,323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 ढोकी  : आरोपी नामे-1) कांताबाई विठ्ठल काटे, 2) मंगल अशोक काटे, 3) ओम विठ्ठल काटे तिघे रा.जवळे दु, ता. जि. उस्मानाबाद यांनी पिकाच्या काकऱ्या तुडवल्याचे विचारण्याचे कारणावरून दि.20.07.2023 रोजी सायंकाळी 18.00 वा. सु. जवळे दु शिवार येथे फिर्यादी नामे- रत्नदिप जालिंदर टेकाळे वय 26, रा. जवळे दु ता. जि. उस्मानाबाद यांना कांताबाई काटे, मंगल काटे, ओम काटे यांनी संगणमत करुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी काठीने मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रत्नदिप टेकाळे यांनी दि.22.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324,323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

फसवणूक 

परंडा  : फिर्यादी नामे- सचिन सुग्रीव गरड, वय 39 वर्षे, रा. ढगेपिंपरी, ता. परंडा जि. उस्मानाबाद यांचे मोबाईल नं मधील फोन पे नंबर 7051288107 वरुन आरोपी नामे- राकेश कुमार, वय 49 आरमड रेजिमेंट मोबाईल नं 3670298772 यांनी  दि 19.07.2023 रोजी 09.30 ते दि.21.07.2023 रोजी 23.00 वा. सु. ढगेपिंपरी येथे मोबाईल फोन पे वापरून सचिन गरड यांचे पैसे परत देण्याचे कारणावरुन 1,90,123 ₹ची  ऑनलाईन फसवणूक केली. अशा मजकुराच्या सचिन गरड यांनी दि.22.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 420 सह आय.टी. ॲक्ट कलम 66(डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मालमत्तेविरुध्द गुन्हे

वाशी : फिर्यादी नामे- महारुद्र संजय भैराट, वय 29 वर्षे, रा. शेलगाव, ता. वाशी जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 45,000₹ किंमतीची होंडा शाईन मोटरसायकल क्र एमएच 25 एएन 5730 ही दि.20.07.2023 रोजी 17.45 वा. सु छत्रपती शिवाजी नगर  वाशी येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या महारुद्र भैराट यांनी दि.22.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web