धाराशिव जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल 

मुरूम , तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल 
 
crime

 मुरुम  :फिर्यादी नामे- प्रमोद गोविंद राठोड, वय 35 वर्षे, रा. शास्त्री नगर तांडा, दाळींब, ता.उमरगा जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप आरोपी नामे- हरीभाउ गंगाराम जाधव, वय 60 वर्षे, 2) भुराबाई हरीभाउ जाधव, वय 55 वर्षे, 3)बालाजी हरीभाउ जाधव, वय 40 वर्षे, 4) राहुल हारीभाउ जाधव, वय 30 वर्षे, 5) श्रावण हरीभाउ जाधव, वय 24 वर्षे, 6) सविता बालाजी जाधव, वय 30 वर्षे, 7) लक्ष्मी प्रमोद राठोड, वय 30 वर्षे,  सर्व  रा. खानापुर तांडा ता. औसा जि. लातुर, यांनी दि.02.07.2023 रोजी 24.00 ते दि. 03.07.2023 रोजी 01.00वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम 1,00,000₹, कागदपत्र, पॅशन प्रो मोटरसायकल क्र एमएच 25 एक्स 7507 किं अंदाजे 1,00,000₹, आधारकार्ड, टीव्ही, होमथिएटर असा एकुण 2,25,000₹ किंमतीचा माल फिर्यादीचे संमतीविना चोरुन नेला. वगैरे मा. जे.एम.एफ.सी कोर्ट उमरगा यांचेकडून सी आरपीसी 156(3) प्रमाणे कागदपत्र प्राप्त वरुन दि.01.10.2023 रोजी मुरुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी  : फिर्यादी नामे-प्रमोद नवनाथ चौधरी, वय 42 वर्षे, रा. सारोळा, ता. बार्शी जि. सोलापूर यांची व शेजारील महेश रमेश गाजरे या दोघांच्या अंदाजे 70,000₹ किंमतीच्या काळ्या रंगाच्या दोन पैकी एक मुरा जातीची व दुसरी गवळाव जातीची असा दोन म्हैस ह्या दि. 29.09.2023 रोजी 22.00 ते दि. 30.03.2023 रोजी 06.00 वा. सु. काटी शिवार येथील शेतातील गोठ्यातुन ता. तुळजापूर जि. धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या प्रमोद चौधरी यांनी दि.01.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web