धाराशिव  जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल 

 
crime

धाराशिव  :  काळामारुती चौक, उस्मानाबाद येथील- अर्चना प्रविण कुंभार, वय 28 वर्षे, या दि. 14.03.2023 रोजी 10.45 वा. सु. उस्मानाबाद बसस्थानक येथे उस्मानाबाद ते कळंब बसमध्ये चढत होते. दरम्यान अर्चना यांचे पर्समधील अंदाजे 7,000 ₹ किमंतीचा मोबाईल फोन अजय विजय शिंदे, वय 27 रुईभर ,ता. उस्मानाबाद गर्दीचा फायदा घेऊन चोरुन नेले. अशा मजकुराच्या अर्चना कुंभार यांनी दि.14.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  :  सातेफळ, ता. कळंब येथील- भाउ भिमराव कांबळे वय 39 वर्षे, यांचे अंदाजे 50,000 ₹किंमतीच्या 5 बिटल शेळ्या ह्या सालगडी- सिध्दार्थ शिनगारे रा. सौंदाणा ता. कळंब यांनी दि. 14.06.2023 19.26 वा. स. सातेफळ ते येरमाळा रस्त्यावरुन चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या भाउ कांबळे यांनी दि.14.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 381 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 मोटरसायकल जाळून  नुकसान 

परंडा  : आसु ता. परंडा येथील- रमेश रोहीदास गणगे  यांचे घरासमोर फॅशन प्रो मोटरसायकल क्र एमएच 14 डीई 2949 हीस, जयतुळजाभवानी आश्रमशाळा टेंभुर्णी ता. माढा यांनी दि.14.06.2023 रोजी .02.47 वा. सु. आग लावून दिली. या मध्ये रमेश यांचे मोटरसायकल जाळून  नुकसान केले. अशा मजकुराच्या रमेश गणगे यांनी दि. 14.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 मारहाण

परंडा  : सोनारी, ता. परंडा येथील- अविनाश ऊर्फ पांडू हांगे, दादा विटकर, हुसेन शेख अन्य 2 नेत्याच्या विरोधात काहीपण बोलतोस या कारणावरून दि.12.06.2023 रोजी 11.30 ते 11.45 वा.सु. पंचायत समिती परंडा  येथे राजुरी, ता. परंडा येथील- बुध्दीमान मुक्ताजी लटके यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बुध्दीमान लटके यांनी दि. 14.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम-324, 323, 504, 506,143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web