तुळजापुरात पोलीस गस्ती दरम्यान तिघे संशयीत ताब्यात

 
Osmanabad police

तुळजापूर  : तुळजापूर पो.ठा. चे पथक दि. 07.09.2021 रोजी 19.10 वा. सु. गस्तीस असतांना तुळजापूर शहरातील येवले चहा हॉटेलच्या आडोशाला अंधारात अनिल मोहन गुंजाळ, रा. बीड हा संशयास्पदरित्या थांबलेला आढळला. तर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्री 02.30 वा. सु. तुळजापूर शहरात रात्रगस्तीस असतांना शहरातील पावनदुर्गा लॉजच्या जवळ अंधारामध्ये अशोक बबन जाधव व कृष्णा परमेश्वर जाधव, दोघे रा. बीड हे संशयास्पदरित्या थांबलेले आढळले. अशा अवेळी तेथे उपस्थित असण्याच्या कारणांबाबत पथकाने त्या तीघांना विचारले असता ते तीघे असंबध्द माहिती देत असल्याने पोलीसांनी त्या तीघांना ताब्यात घेउन त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम- 122 अंतर्गत तुळजापूर पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

जुगार खेळल्या प्रकरणी 5 आरोपींना प्रत्येकी 300 ₹ दंड

अंबी : जुगार खेळून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) चे उल्लंघन केल्याप्रकरणी अंबी पो.ठा. हद्दीतील 5 व्यक्तींना प्रत्येकी 300 ₹ दंड व दंड न भरल्यास पाच दिवस साध्या कारावासाची शिक्षा आज दि. 08 ऑक्टोबर रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी सुनावली आहे.

From around the web