उस्मानाबाद जिल्ह्यात तीन अपघातात तीन ठार ,तीन जखमी 

 
Osmanabad police

नळदुर्ग  : चव्हाणवाडी, ता. तुळजापूर येथील तुकाराम उमाकांत खलाटे व आम्रपाली, वय 25 वर्षे हे दोघे पती- पत्नी दि. 03.10.2021 रोजी 18.00 वा. सु. चवहणवाडी शवारातील रस्त्याने ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एएस 5516 मधून प्रवास करत होते. यावेळी नमूद ट्रॅक्टरच्या अज्ञात चालकाने निष्काळजीपने, भरधाववेगात ट्रॅक्टर चालवण्याने तो पलटला. या अपघातात नमूद खलाटे पती- पत्नींच्या अंगावर ट्रॅक्टर पलटल्याने आम्रपाली या मयत झाल्या तर तुकाराम खलाटे हे जखमी झाले. अशा मजकुराच्या तुकाराम खलाटे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा : रत्नापुर येथील संतोष भिमराव वडुजे, वय 35 वर्षे हे दि. 27.11.2021 रोजी 10.00 वा. सु. उंबरा फाटा येथील रस्त्याने मोटारसायकल चालवत जात होते. यावेळी कार क्र. एम.एच. 12 क्युएफ 3913 च्या धडकेत ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचे जावई- महेश बारसकर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : बारुळ, ता. तुळजापूर येथील किरण बसवेश्वर ठोंबरे यांच्या सोबत लक्ष्मण राजु बिजापुरे, रा. हुपरि, ता. हातकलंगले हे दि. 07.11.2021 रोजी 19.30 वा. सु. हंगरगा (तुळ) शिवारातील रस्त्याने मोटारसायकलने प्रवास करत होते. यावेळी अज्ञात चालकाने कार क्र. एम.एच. 25 एके 3434 ही निष्काळजीपने चालवून किरण ठोंबरे चालवत असलेल्या मो.सा. ला समोरुन धडक दिली. या अपघातात लक्ष्मण बिजापुरे हे मयत झाले तर किरण ठोंबरे हे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचारकामी न नेता, अपघाताची खबर नजीकच्या पोलीस ठाण्यास न देता नमूद कारचा अज्ञात चालक वाहनासह अपघात स्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या किरण ठोंबरे यांनी दि. 27 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अत्यावश्क वस्तु अधिनियमांतर्गत एकावर गुन्हा दाखल

उमरगा : उमरगा पोलीस ठाण्याचे पथक दि. 26.11.2021 रोजी 03.00 वा. सु. जकेकुर चौरस्ता परिसरात रात्रगस्तीस होते. यावेळी शरणय्या विरय्या हिरेमठ, रा. हुनसी हडगीळ, ता. अफजलपुर, जि. गुलबर्गा, राज्य- कर्नाटक हे स्वस्त धान्य दुकानातील 50 कि.ग्रॅ. वजनाची तांदळाची 60 पोती बेकायदेशीररित्या विक्रीच्या उद्देशाने घेउन जात असतांना आढळले. यावरुन उमरगा पो.ठा. चे पोलीस हेडकॉन्स्टेबल- कांतु राठोड यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन अत्यावश्यक वस्तु अधिनियम कलम- 3, 7 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web