धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 
 

 
crime

आंबी  :फिर्यादी नामे- विकास अर्जुन गांडाळ, वय 42 वर्षे, रा. अंबी, ता. भुम जि. उस्मानाबाद यांचे राहाते घराचे दार अज्ञात व्यक्तीने उघडून दि. 25.08.2023 रोजी 13.00 वा. सु. आत प्रवेश करुन कपाटातील 30 ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन भार चांदीची जोडवे व रोख रक्कम 1,500₹ किंमतीचा माल चोरुन नेला अशा मजकुराच्या विकास गांडाळ यांनी दि.26.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 454, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : फिर्यादी नामे-दिपक अशोक सरडे, वय 39 वर्षे, रा. पळसप ता. जि. उस्मानाबाद यांचे घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.26.08.2023 रोजी 00.00 ते 04.00 वा. सु. तोडुन आत प्रवेश करुन रोखं रक्कम 10,000₹, तसेच त्यांचे गावातील नेताजी फुटाने यांचे घरातील जिवो कंपनीचा मोबाईल व किराणा सामान असा एकुण 13,000 ₹किंमतीचा माल हा चोरुन नेला. अशा मजकुराच्या दिपक सरडे यांनी दि.26.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : फिर्यादी नामे- तुषार हनुमंत धनके, वय 25 वर्षे, रा.सिंदफळ, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.26.08.2023 रोजी 10.00 ते 14.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील लाकडी कपाटाचे लॉक तोडून कपाटातील 7 ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत 15,500₹ व चादीच्या चैन, जोडवे, ताठ, ग्लास किंमत अंदाजे 6,000₹ असा एकुण 21,500 ₹ किमंतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या तुषार धनके यांनी दि.26.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 454, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web