त्रासास कंटाळून शेकापूरच्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

धाराशिव : वेळोवेळी होत असलेल्या जाचास व त्रासास कंटाळून शेकापूर येथील एका तरुणाने स्वतः च्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीवन अशोक कांबळे ( वय 30 ) असे या तरुणाचे नाव आहे. आरोपी नामे- 1) नवनाथ राजेभाउ लगदिवे, 2) संतोषी जिवन कांबळे, दोघे रा. शेकापुर, ता.जि. धाराशिव, 3) बालीका हनुमंत साठे, रा. मालेगाव ता. बार्शी, जि. सोलापूर, 4) कोमल भारत चांदणे, 5) बाबा भारत चांदणे,दोघे रा. अंबेजवळगे, ता.जि. धाराशिव यांचे कडून वेळोवेळी होत असलेल्या जाचास व त्रासास कंटाळून जिवन कांबळे यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचा भाउ- युवराज अशोक कांबळे, वय 31 वर्षे, रा. शेकापुर, ता. जि. धाराशिव यांनी दि. 01.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- 306, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
हाणामारीचे दोन गुन्हे दाखल
शिराढोण : आरोपी नामे-1) मिरा सोमनाथ बनसोडे,2 ) भाउराव सोपान वाघे, दोघे रा. खामसवाडी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.26.09.2023 रोजी 20.30 वा. सु. खामसवाडी शिवारात फिर्यादी नामे- साखरबाई उत्तम सौदागर, वय 60 वर्षे, रा. खामसवाडी, ता. कळंब जि. धाराशिव यांना भिंतीच्या विटा का घेतल्यास या कारणावरुन शिवीगाळ करुन दगडाने मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या साखरबाई सौदागर यांनी दि.01.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम : आरोपी नामे-1)जहॉगीर वली मुदगडे, 2) वली उमर मुदगडे, 3) नुरजहॉ वली मुदगडे सर्व रा. दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.01.10.2023 रोजी 15.00 वा. सु. दाळींब येथे फिर्यादी नामे- बेगम बी राजेसाब शेख, वय 48 वर्षे, रा. जकेकुर, ता. उमरगा जि. धाराशिव यांची मुलगी नामे जिया हिस नमुद आरोपी शिवीगाळ करुन मारहाण करत असताना फिर्यादी व साक्षीदार आशीब पठाण हे नमुद आरोपींना समजावून सांगत असताना नमुद आरोपींनी फिर्यादी व त्यांची मुलगी जिया यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्याने, दगडाने मारहाण केली. अशा मजकुराच्या बेगमबी शेख यांनी दि.01.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.