ऐन गणेशोत्सवात जिल्ह्यात हाणामारीच्या सात घटना 

ढोकी, नळदुर्ग, तामलवाडी, परंडा, अंबी, कळंब. धाराशिव पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद 
 
crime

ढोकी  : आरोपी नामे-1)मुस्कान नईम पठाण,रा. मरकत मस्जीद तेर ता. जि. धाराशिव यांनी दि.19.09.2023 रोजी 10.00 ते 10.15 वा. सु. तेर येथे फिर्यादी नामे- जमिला नदीम पठाण, वय 49 वर्षे, रा. मरकज मस्जीद तेर ता. जि. धाराशिव यांनी नमुद आरोपीस गॅसची शेगडी फरशीवर खाली दे असे म्हणाले असता  त्याचा राग मनात धरुन नमुद आरोपीने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, तांब्याने  मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीच्या उजव्या हाताचे कोपऱ्यावर दाताने चावा घेवून जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी जमिला पठाण यांनी दि.21.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 325अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : आरोपी नामे-1)सागर बळी पारवे, रा. बसवंतवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.21.09.2023 रोजी 07.00 वा. सु. बसवंतवाडी शिवार येथे फिर्यादी नामे- ज्ञानदेव धोंडीबा पारवे, वय 32 वर्षे, रा. बसवंतवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना जुन्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने, कत्तीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी ज्ञानदेव पारवे यांनी दि.21.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324,323,504,506अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : आरोपी नामे-1) ज्ञानदेव धोंडीबा पारवे, 2) सिंद्राम धोंडीबा पारवे दोघे रा. बसवंतवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.21.09.2023 रोजी 07.00 वा. सु. बसवंतवाडी शिवार येथे फिर्यादी नामे- सागर बळी पारवे, वय 29 वर्षे, रा. बसवंतवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने तु आमच्या वड्या मध्ये म्हैशी का चारल्या  या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने, कत्तीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी सागर पारवे यांनी दि.21.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी : आरोपी नामे- संजय वसंत गायकवाड, 2) सोमनाथ वसंत गायकवाड, 3) वसंत सोपान गायकवाड सर्व रा. देवकुरळी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 20.09.2023 रोजी 22.00 वा. सु.  देवकुरळी येथील समाज मंदीरा जवळ फिर्यादी नामे- संतोष जालिंदर गायकवाड, वय 37 वर्षे, रा. देवकुरुळी, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे शेतातुन घरी येत असताना नमुद आरोपीतानी गावातील समाज मंदीरासमोर अचानक पणे येवून फिर्यादीस शिवीगाळ करुन लोखंडी सळईने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचे वडील व भाउ हे भांडण सोडवण्यास आले असता त्यासही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी संतोष गायकवाड यांनी दि.21.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 तामलवाडी  : आरोपी नामे-1) संतोष गायकवाड, 2) जालिंदर गायकवाड, 3) बाळु गायकवाड, 4)भरत गायकवाड सर्व रा. देवकुरळी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 20.09.2023 रोजी 22.00 वा. सु.  देवकुरळी येथील समाज मंदीरा जवळ फिर्यादी नामे- रुक्मिणी वसंत गायकवाड, वय 50 वर्षे, रा. देवकुरुळी, ता. तुळजापूर जि.धाराशिव या तिचे कुटूंबासोबत घरा समोर बसली असता दारात कुत्र आल्यामुळे त्याला हाण्ण्यासाठी फिर्यादीचे मुलाने चप्पल उगारली असता नमुद आरोपी म्हाणाले की चप्पल कोणाला उगारली असे म्हणून फिर्यादीचे मुलास शिवीगाळ  करुन लोखंडी पाईपने, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी रुक्मिणी गायकवाड यांनी दि.21.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

परंडा : दि. 21.09.2023 रोजी 17.00 वा. सु. खानापुर येथील ग्लोबल शाळेच्या पुढे अंदाजे 200 फुट अंतरावर एल ॲन्ड टी. फायनन्संचा वसुली अधिकारी काशीम मकबुल खान व फिर्यादी नामे- आप्पासाहेब आत्माराम ढिगारे, वय 38 वर्षे व्यवसाय निखील एन्टरप्रायजेस चौक परंडा ता. परंडा जि. धाराशिव येथे वसुली अधिकारी असे दोघे नमुद आरोपी नामे-1)गणेश विठ्ठल उघडे, 2) विठ्ठल उघडे, आनोळखी एक सर्व रा. पाचवड ता. परंडा जि. धाराशिव यांनी एल.ॲन्ड टी. फायनांन्स कंपनीकडून ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतलेल्या मालकाची माहिती घेवून ते परंडा येथील बावची चौकात असल्याचे समजले वरुन फिर्यादी व वसुली अधिकारी त्यांचे कडे जवून थकीत हप्ते बाबत विचारपूस करत असताना नमुद आरोपीतांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लोखंडी टॉमीने डोक्यात मारहाण करुन जखमी केले. व वसुली अधिकारी काशीम खान यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी आप्पासाहेब ढिगारे यांनी दि.21.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 अंबी  : आरोपी नामे-1)अप्पा ढिगारे, व इतर अनोळखी तीन यांनी दि. 21.09.2023 रोजी ट्रॅक्टरचे कर्जचे हप्ते थकीत झाल्याचे कारणावरुन दि. 21.09.2023 रोजी 17.00 वा. सु. हरन ओढा आनाळा येथे फिर्यादी नामे- विठ्ठल मारुती उघडे, वय 73 वर्षे, रा. पाचवड ता. परंडा जि. धाराशिव यांनी एल.ॲन्ड टी. फायनांन्स कंपनीकडून ट्रॅक्टरसाठी कर्जाचे घेतलेले ते हप्ते न थकीत झाल्यामुळे नमुद आरोपीतांनी संगणमत करुन फिर्यादीस हरन ओढयाचे पुढे आडवून दगडाने मारहान करुन जखमी केले. व गेळे वस्ती येथे पुन्हा दोन ते तीन अनोळखी लोकांनी दगड मारल्याने फिर्यादी ट्रॅक्टर सह रोडच्या बाजूच्या पत्रयाचे शेड मध्ये घुसल्याने सदर महिला मिराबाई गेळे व मुलगा गणेश गेळे जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी विठ्ठल मारुती उघडे यांनी दि.21.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-  341, 324, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 कळंब  : आरोपी नामे-1)विशाल भिमराव खंडागळे रा. मोहा, ता. कळंब जि. धाराशिव यांनी फिर्यादी नामे- सुदामती माणिक खंडागळे, वय 65 वर्षे, रा. मोहा, ता. कळंब जि. धाराशिव यांना दि. 21.09.2023 रोजी 17.00 वा. सु. फिर्यादीच्या घरासमोर नमुद आरोपी हा घरात आला व फिर्यादीच्या मुलास जमीनीची वाटणी करुन माझ्या हिश्‌यांची जमीन मला ध्या असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन दगडाने फिर्यादीच्या डोक्यात मारुन जखमी केले. त्यावेळी फिर्यादीचा मुलगा भांडण सोडविण्यास आला असता यातील आरोपीत यांनी सोमनाथ यास ढकलून देवून  शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी सुदामती खंडागळे यांनी दि.21.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब  पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 452, 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : आरोपी नामे-1)प्रसाद निंबाळकर, 2)वैभव गवळी,3) उदय काकडे व इतर  3 अनोळखी सर्व रा. धाराशिव ता.जि.धाराशिव यांनी तु आमच्या व वस्तादच्या भांडणात का पडलास तु भांडण का सोडवलेस या कारणावरुन दि. 15.09.2023 रोजी 19.00 वा. सु. तुळजाभवानी स्टेडीअम बाहेर गेटवर धाराशिव येथे  फिर्यादी नामे- विजय शंकर शेगरे, वय 19 वर्षे, रा. मुरुड ता. जि. लातुर हा. मु. हातलाई कुस्ती संकुलन धाराशिव ता. जि. धाराशिव यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी गजाने, फायटरने डोक्यात मारुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी विजय शेगरे यांनी दि.21.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web