पहिल्या पत्नीशी तलाक झाल्याचे खोटे सांगून दुसरा निकाह 

काटीमध्ये छळाला कंटाळून दुसऱ्या पत्नीची आत्महत्या 
 
Osmanabad police

तामलवाडी :  काटीमध्ये रियाज शबीर अत्तार याने  पहिल्या पत्नीशी तलाक झाल्याचे खोटे सांगून दुसरा निकाह केला. दुसरीला माहेराहून दोन लाख घेऊन ये म्हणून ये म्हणून छळ केला. या छळाला कंटाळून दुसऱ्या पत्नीने आत्महत्या केली. याप्रकरणी तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

 श्रीमती- रिजवाना रियाज अत्तार, वय 32 वर्षे, रा. काटी, ता. तुळजापूर यांनी दि. 01.09.2021 रोजी राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. 

पती- रियाज शब्बीर अत्तार यांनी पहिल्या पत्नीशी तलाक झाला असल्याचे रिजवाना यांना खोटी हकीकत सांगून रिजवाना यांच्याशी 2019 साली विवाह केला होता. विवाहानंतर रिजवाना यांचे सासरकडील- रियाज अत्तार (पती), शाहिदा अत्तार (सासु), सुलताना अत्तार, तनुजा अत्तार (रियाज यांची पहिली पत्नी) यांनी रिजवाना यांचा वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ करुन त्यांना माहेराहुन 2,00,000 ₹ आनण्याचा तगादा लावला.

 या छळास कंटाळून रिजवाना यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या रफीक नबीलाल डोंगरी, रा. सोलापूर यांनी दि. 02 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 498 (अ) 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

दोन ठिकाणी हाणामारी 

परंडा : लहु अंकुश काशीद, रा. दुधी, ता. पंरडा हे सहपत्नीक दि. 30.08.2021 रोजी 17.00 वा. सु. शेतातील घरात होते. यावेळी ग्रामस्थ- लक्ष्मण जगदाळे, महादेव जगदाळे, मारुती जगदाळे, सौदागर जगदाळे, नामदेव जगदाळे, बाळासाहेब कवटे, बाबासाहेब कवटे यांसह अन्य एक अनोळखी पुरुष अशा आठ जणांनी संगणमत करुन पुर्वीच्या वादावरुन काशीद यांच्या घरात घुसून लहु यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी देउन कोयता, लोखंडी गज, चैन, काठी, दगडाने मारहान केली. यात लहु यांच्या डाव्या पायाचे हाड मोडून ते गंभीर जखमी झाले. यावेळी लहु यांची पत्नी त्यांच्या बचावास सरसावली असता त्यांनाही मारहान केली. अशा मजकुराच्या लहु काशीद यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 326, 384, 323, 143, 147, 148, 149, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : कोंड येथील नरसिंग चव्हाण हे पत्नी महानंदासह दि. 01 सप्टेंबर रोजी 16.30 वा. कोंड शिवारातील शेतात होते. दरम्यान पती- पत्नीत झालेल्या वादातून नरसिंग यांनी महानंदा यांच्या मस्तकावर पाठ, पोट व हातावर विळ्याने वार करुन गंभीर जखमी करुन कापडाने महानंदा यांचा गळा आवळून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहानीत महानंदा यांच्या डाव्या हाताचे हाड मोडले. अशा मजकुराच्या मुलगा- सचिन चव्हाण याने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 326 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web