परंडा : साक्षकामी न्यायालयात गैरहजर राहणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

परंडा  : बावची, ता. परंडा येथील सतिष साहेबराव भोसले यांना परंडा न्यायालयात दि. 10.12.2021 रोजी एका प्रकरणात हजर राहण्याचा न्यायालयीन आदेश झाला असतांना भोसले यांनी जाणीवपुर्वक गैरहजर राहून तो न्यायालयीन आदेश डावलला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 229 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोकअदालतीत आर्थिक दंडाच्या शिक्षा

कळंब : सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) चे उल्लंघन करणाऱ्या 35 गुन्ह्यातील 35 आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कळंब येथील आज दि. 11.12.2021 रोजीच्या लोकअदालतीत एकुण 29,500 ₹ दंड ठोठावण्यात आला.

वाहतुक शाखा, उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील आज दि. 11.12.2021 रोजीच्या लोकअदालतीत मोटार वाहन कायदा- नियम भंग करणाऱ्यांवर पोलीसांनी केलेल्या  144 कारवायांत 77,100 ₹ दंड ठोठावण्यात आला. तसेच या लोकअदालतीचे समन्स मिळताच 495 कारवायांतील व्यक्तींनी वाहतूक शाखेत 1,61,300 ₹ तडजोड शुल्क भरले आहे. अशा प्रकारे 639 कारवायांत 2,28,400 ₹ दंड व तडजोड शुल्क प्राप्त झाले आहे.

From around the web