भोसगा शिवारात मोटारसायकल अपघातात एक ठार, एक जखमी 

 
crime

मुरुम  : आरोपी नामे- संतोष दयानंद माळकुंजे रा. कुन्सावळी, ता. तुळजापूर जि. धाराशिव, सोबत मयत नामे- शफीक अल्लाउद्दीन मुल्ला, वय 27 वर्षे, रा. कुन्सावळी, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दोघे दि. 23.09.2023 रोजी 18.00 वा. सु. भोसगा शिवारातुन  मोटरसायकल क्र एमएच 25 एवाय 2144 ही वर बसुन मयत नामे शफीक  मुल्ला यांचे शेतात जात होते.दरम्यान संतोष माळकुंजे यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवल्याने नमुद मोटरसायकल घसरल्याने संतोष माळकुंजे व शफीक मुल्ला हे  दोघे गाडीवरन खाली पडून संतोष माळकुंजे हे जखमी होवून शफीक मुल्ला हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी रुफीक अल्लाउदीन मुल्ला, वय 36 वर्षे, रा. कुन्सावळी, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.26.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

हायगई व निष्काजीपणे वाहन चालविणाऱ्यावर गुन्हा दाखल

ढोकी  : दत्तनगर ढोकी ता. जि. धाराशिव येथील- आकाश छम्मा काळे, वय 23 वर्षे, यांनी दि. 26.09.2023 रोजी 19.10 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्रं. एम.एच.25 एस 0681 ही ढोकी पेट्रोल पंप चौकात ढोकी येथे सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना ढोकी पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 279 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 गावशिवारात आरडा ओरड करणाऱ्या मद्यपीवर गुन्हा दाखल

ढोकी  :रामवाडी, ता. जि. धाराशिव येथील- अमोल पांडुरंग शिंदे, वय 33 वर्षे, हे दि.25.09.2023 रोजी 21.40 वा सुमारास रामवाडी गावातील गणेश मुर्तीच्या समोर मद्यधुंद अवस्थेत आरडा ओरड करून गोंधळ घालताना ढोकी पो. ठा. च्या पथकास मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द म.द.का. कलम 85(1)  अन्वये ढोकी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
           

From around the web