नळदुर्ग पोलिसाला लाथाबुक्यांनी मारहाण , दोन जणांवर गुन्हा दाखल 

होर्टीत बैल पोळ्यादिवशी बैलावरून हाणामारी , दोन जखमी 
 
crime

नळदुर्ग  :आरोपी नामे-1) राजेंद्र मच्छींद्र कोनाळे, 2) दत्तात्रय विनायक भोसले, दोघे रा. गंधोरा, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी फिर्यादी नामे- दत्तात्रय माणिकराव कुंभार, वय 39 वर्षे,पोलीस अमंलदार/437  ने पोलीस ठाणे नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव हे तुळजापूर येथील समन्स बजावणी करुन नळदुर्ग हद्दीतील समन्स बजावणी करणेकामी जात असताना तहान लागली म्हणून पाण्याची बाटली घेण्यासाठी दि.15.09.2023 रोजी 15.00 वा. सु. नागझरी पाटील येथील विकास धाबा येथे थांबले असता यातील नमुद आरोपीतांनी तु धाब्यावर शासकीय मोटार सायकल का आणलास असे कारण काढून फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यावरुन दत्तात्रय माणिकराव कुंभार यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 353, 34अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

होर्टीत बैल पोळ्यादिवशी बैलावरून हाणामारी , दोन जखमी 

 नळदुर्ग  : आरोपी नामे-1)चेतन चंद्रकांत राजमाने, 2)पवन बब्रुवान ताटे, 3) ओम शिवाजी ताटे, 4) मारुती विठ्ठल ताटे, 5) तुकाराम मुर्टे  सर्व रा. होर्टी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 14.09.2023 रोजी 20.30 वा. सु. होर्टी येथील लक्ष्मी मंदीराजवळ फिर्यादी नामे सौरभ अंगद गायकवाड, वय 24 वर्षे, रा. होर्टी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे बैल घराकडे घेवून जात असताना नमुद आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवून तु बैल आमच्या बैलाचे पुढे घेवून जा अशी भांडणाची कुरापत काढून जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी लोखंडी रॉड, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादी यांचे मामा प्रमोद दुपारगुडे हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही लाकडाने डोक्यात मारुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या डोक्यात मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी सौरभ गायकवाड यांनी दि.16.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149, सह अ.जा.अ.ज.प्र.का. कलम 3(1)(आर),3(1) (एस), 3(2) (व्हिए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web