कळंबमध्ये पारधी पिढीवर तुफान हाणामारी

कळंब : कल्पना नगर, पारधी पिढी, कळंब येथील- बाळू पवार, राजा पवार, विशाल पवार, तुमच्या घराकडे जाउन भांडण करा असे बोलण्याचे कारणावरून दि.12.06.2023 रोजी 20.30 वा.सु. कल्पनानगर पारधी पिढी येथे गावकरी- अशोककल्याण पवार यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, दगडाने डोक्यात मारुन जखमी केली. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अशोक पवार यांनी दि. 13.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.\
अपघातात एक ठार
येरमाळा : राजनंदिनी बिअर बार, बार्शी रोड येरमाळा येथे दि.12.06.2023 रोजी 06.45 पुर्वी अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून यातील अनोळखी पुरुष जातीचे अंदाजे वय 65 वर्षे यांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी होऊन मयत झाले. या अपघातानंतर नमूद अज्ञात वाहन चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या पोलीस ठाणे येरमाळा येथील- पोलीस नाईक/1555 विशाल रमेश गायकवाड यांनी दि.13.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मालमत्तेविरुध्द गुन्हे
तुळजापूर : बिजनवाडी, ता. तुळजापूर येथील- गोकुळ रामराव माने, वय 30 वर्षे, सोबत पत्नी उपासना हे दोघे दि. 13.06.2023 रोजी 17.15 वा. सु. तुळजापूर बसस्थानक येथे तुळजापूर ते येवती बस मध्ये चढत होते. दरम्यान उपासना यांचे गळ्यातील अंदाजे 38,000 ₹ किमंतीचे सुवर्ण दागिणे अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेऊन चोरुन नेले. अशा मजकुराच्या गोकुळ माने यांनी दि.13.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.