उमरग्यात अवैधरित्या गुटखा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

एक आरोपी जेरबंद , ४८ लाखाचा मुद्देमाल जप्त 
 
s

 धाराशिव  - धाराशिव जिल्ह्यात प्रत्येक पान  टपरी, चहाचा ठेला, किराणा दुकान, हॉटेल्सवर बंदी असलेला गुटखा सर्रास विकला जात होता. त्याच्या बातम्या धाराशिव लाइव्हने  प्रसिद्ध केल्यानंतर पोलिसाना जाग आली आहे. उमरगा पोलिसांनी अवैधरित्या गुटखा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश  केला आहे. 


शहरातील  रिलायन्स पेट्रोलपंप चौरस्ता उमरगाचे पाठीमागील शेतशिवारात बंद पडलेल्या कुक्कुटपालन शेडमध्ये अवेधरित्या गुटखा तयार करुन साठा करुन विक्री व्यवसाय करत असल्याची माहिती मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकारी  बरकते , उमरगा पोलीस ठाण्याचे प्रभारी  निरीक्षक पारेकर, सपोनि कासार, मपोउनि माने, पोलीस हावलदार घोळसगाव, बोईने, मारेकर, गायकवाड, खतीब, पोलीस नाईक- सय्यद, कावळे, राउत, कांबळे, पोलीस अमंलदार- उंबरे, मुळे, मते, भोरे, सगर, सोनटक्के, बिराजदार, व दोन पंच असे मिळून वर नमुद ठिकाणी छापा मारला. 

x

सदर ठिकाणावरुन गुटखा तयार करणारे 09 मिक्सर मशिन, गुटखा तयार करण्यासाठी लागणारे  सुपारी, जर्दा, कात, सुगंधी तंबाखु व तयार पॅकींग केलेला गोवा गुटखा माल व वाहतुकीसाठी वापरलेले वाहन टाटा टेम्पो ट्रक एमएच 13 सीयु 5126 असा एकुण 48,45,500 ₹ किंमतीचा मुद्देमाल मिळून आलेने जप्त करुन मिळून आलेला एका आरोपी नामे- बस्वराज दिलीप बिराजदार, वय 29 वर्षे, रा. आरोग्य नगरी उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव याचे विरुध्द पोलीस ठाणे उमरगा येथे गुरनं 514/2023  भा.द.वि. सं. कलम 328, 272, 273, 188 सह अन्न व सुरक्षा व मानके कायदा 2006 मधील कलम  26 (2), (आय), 26(2) (आय.व्ही), 27 (3), (ई), 30(2) दंडनिय कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

s

          सदर कामगिरी ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी बरकते साहेब, उमरगा पोलीस ठाण्याचे प्रभारी  निरीक्षक पारेकर, सपोनि कासार, मपोउनि  माने, पोलीस हावलदार घोळसगाव, बोईने, मारेकर, गायकवाड, खतीब, पोलीस नाईक- सय्यद, कावळे, राउत, कांबळे, पोलीस अमंलदार- उंबरे, मुळे, मते, भोरे, सगर, सोनटक्के, बिराजदार, यांचे पथकाने केली.

From around the web