धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे 

 
crime

आंबी  : आरोपी नामे-1) उत्तम ज्ञानबा लांडगे, 2) अमोल उत्तम लांडगे, 3) बलभीम ज्ञानबा लांडगे, 4)पुजा बलभीम लांडगे,सर्व रा. कुक्कडगाव, ता. परंडा जि. उस्मानाबाद यांनी दि. 24.03.2023 रोजी 19.30 वा. सु. कुक्कडगाव गावातील समाज मंदीराच्या समोर फिर्यादी नामे- उध्दव येडबा लांडगे, वय 65 वर्षे रा. कुक्कडगाव, ता. परंडा जि. उस्मानाबाद थांबलेले असताना त्यांनी वरील आरोपीना “माझे जागेत घर का बांधले” असे विचारले असता आरोपी यांनी “तु कोण आम्हाला विचारणारा” असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने, काठीने मारहान करुन जखमी केले. तसेच सदर जागेची परत मागणी केल्यास जिवे ठार मार अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी उध्दव लांडगे यांनी दि.25.08.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  : आरोपी नामे-1)गणेश धोंडीबा सोनटक्के रा. येणेगुर ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी दारु पिलेले पैसे मागीतल्याचे कारणावरुन दि.24.08.2023 रोजी 22.05 वा. सु. फिर्यादी नामे- श्रीहरी नारायण बोडगे, वय 36 वर्षे, रा. उमरगा जि. उस्मानाबाद यांना त्यांचे घरासमोर जावून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन तेथील दगड हातात घेवून उजवे पायाचे गुडघ्यावर मारुन जखमी करुन जिवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या श्रीहरी बोडगे यांनी दि. 25.08.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा : आरोपी नामे-1)नबीलाल जैनू मुल्ला, 2)रबाना नबीलाल मुल्ला, 3)शमीर अबीलाल मुल्ला,4)शोयब अबीलाल मुल्ला सर्व रा. वेठसागंवी वाडी ता. उमरगाजि. उस्मानाबाद यांनी दि.24.08.2023 रोजी 17.30 वा. सु. पेठसांगवी येथे फिर्यादी नामे- मौला खादीर मुल्ला, वय 76 वर्षे रा. पेठसांगवी वाडी, ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांना तु आमच्या डीपीला वायर का लावलास असे म्हणून शिवीगाळ केली.त्यावर फिर्यादी त्यास म्हणाले की हा डी पी तुमच्या शेतामध्ये नाही मी वायर लावणार असे म्हणाले असता यातील आरोपीतांनी संगणमत करुन फिर्यादीच्या डोक्यात काठीने मारहाण केली. तेव्हा फिर्यादीचा मुलगा व पत्नी भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही लाथाबुक्यांनी मारहान करुन तुम्हाला बघुन घेतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फियादी मौला मुल्ला यांनी दि. 25.08.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504,34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
वाशी  : आरोपी नामे-1) दादा बाजीराव लांडे, 2) संदीप उर्फ बाळू दादा लांडे, 3) मनीषा दादा लांडे सर्व रा. नागेवाडी ता. भुम जि. उस्मानाबाद  यांनी दि.24.08.2023 रोजी 20.00 वा. सु. नागेवाडी येथे फिर्यादी नामे- नागनाथ दगडू पवार, वय 50 वर्षे, रा. नागेवाडी ता. भुम जि. उस्मानाबाद  यांच्या बैलाची टक्कर  आरोपी यांच्या बैला सोबत लागल्याने त्यात आरोपी यांच्या गैलाचा एक दात पडल्यामुळे यातील आरोपीतांनी  फिर्यादी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नी व मुलगा त्यांचे बचावास आले असता त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नागनाथ पवार यांनी दि.25.08.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                                                                   

                                                 

From around the web