खताळवाडीत दोन गटात तुफान हाणामारी, पाच जखमी 

धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधी तक्रारी दाखल 
 
crime

 धाराशिव  : आरोपी नामे-1)परमेश्वर शहाजी कोळेकर, 2) तुकाराम शिवाजी कोळेकर, 3)मिना भ्र राजेंद्र खताळ, 4) शिवाजी केरबा कोळेकर, 5) राजेंद्र भैरु खताळ, 6) अशोक राजेंद्र खताळ, 7) उमा भ्र परमेश्वर कोळेकर, 8) माधुरी बापु खंडागळे, 9) बापु गणपती खंडागळे, दोघे रा. धाराशिव, 10) प्रभा शहाजी कोळेकर, 11) शहाजी केरबा कोळेकर, 12) रेणुका तुकाराम कोळेकर, 13) अशोक शिवाजी कोळेकर,सर्व रा. खताळवाडी, ता. जि. धाराशिव यांनी दि. 01.10.2023 रोजी शेतीच्या वादाचे कारणावरुन फिर्यादी नामे- सुग्रीव लक्ष्मण खताळ, वय 42 वर्षे, रा. खताळवाडी, ता. जि. धाराशिव हे व त्यांची पत्नी, वडील व भाउ शेडमधील म्हशीच्या धारा काढत असताना नमुद आरोपी आले व फिर्यादीचे शेडमधील जनावरे सोडून देत असताना फिर्यादीने तुम्ही जनावरे का सोडून देता असे विचारले असता नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राडीच्या तुब्यांने, दगडाने,काठीने मारहाण करुन उजवा हात फॅक्चर केला. तसेच फिर्यादीचे पत्नी, वडील लक्ष्मण खताळ, भाउ आबा लक्ष्मण खताळ यांना ही नमुद आरोपी यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकडाचे दांड्याने मारुन जखमी केले. व वडीलांचे बंडीमध्ये ठेवलेले 85,000₹ काडून घेतले. व जिवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुग्रीव खताळ यांनी दि.01.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 326, 325, 327, 324, 143, 147, 148, 149, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव : आरोपी नामे-1)आबा खताळ, 2) सुग्रीव खताळ, 3) लक्ष्मण खताळ, 4) ज्योती खताळ, 5) चिऊ खताळ सर्व रा. खताळवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि. 01.10.2023 रोजी 07.00 ते 07.15 वा. सु. खताळवाडी शेत गट नं 59 येथे फिर्यादी नामे- तुकाराम शिवाजी कोळेकर, वय 30 वर्षे, रा. खताळवाडी, ता. जि. धाराशिव यांना शेतीच्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोंखडी रॉडने, दगडाने, मारहाण करुन गंभीर जखमी केले. व फियार्दीचे भाउ परमेश्वर कोळेकर व बहिण मिना खताळ यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. या जमिनीत गट नं 59 मध्ये पाय ठेवला तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली.अशा मजकुराच्या तुकाराम कोळेकर यांनी दि.02.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 326, 324, 323, 143, 148, 149, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

------------

धाराशिव : आरोपी नामे-1)देवा नामदेव काकडे, 2) सिध्देश्वर  वारीक, 3)सुरेश माणिक काकडे, अनोळखी तीन यांनी दि. 02.10.2023 रोजी 12.30 वा. सु. सिध्देश्वर बेकरी समोर सांजा चौक धाराशिव येथे फिर्यादी नामे- विनय प्रकाश शिंदे, वय 37 वर्षे, रा. साळुंके नगर, धाराशिव यांचे बेकरी समोर येवून शिवीगाळ करुन तु आम्हाला प्रत्येक महिन्याला 10,000₹ प्रमाणे दुकानाचा हफता दे नाहीतर तुझी बेकरी चालू देणार नाही. तुला जिवे ठार मारु अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या विनय शिंदे यांनी दि.02.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 384, 143, 149, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web