उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या पाच घटना 

 
Osmanabad police

कळंब  : डिकसळ, ता. कळंब येथील विकास सुनिल वाघमारे व उत्तरेश्वर अदमाने यांच्या गावातीलच शिराढोन रस्त्याकडेला असलेल्या दोन हातगाड्याचे कुलूप दि. 07- 08.12.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने तोडून आतील 3 एलपीजी टाक्या व 2 शेगड्या चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या विकास वाघमारे यांनी दि. 15 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 बेंबळी : नितळी, ता. उस्मानाबाद ग्रामस्थ- संतोष कल्याण क्षिरसागर यांच्या गट क्र. 367 मधील शेत विहीरीवरील 5 अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पानबुडी पंप दि. 04- 05.12.2021 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या संतोष क्षिरसागर यांनी दि. 15 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत नितळी ग्रामस्थ- विलास आण्णा माने हे दि. 14.12.2021 रोजी 20.00 वा. सु. शेतातून गावात आले असता ग्रामस्थ- नगनाथ पांडुरंग माने यांनी विलास यांना त्यांच्या शेतातील मळणी केलेल्या सोयादाने घरी आणण्या विषयी विचारले व अचानक तेथून निघून गेले. यावर विलास यांना संशय आल्याने त्यांनी नगनाथ माने व गोपाळ मडके या दोघांचा लपून- छपून पाठलाग केला असता ते दोघे विलास माने यांच्या शेतात पोचले. यावेळी नगनाथ माने व गोपाळ मडके यांनी मळणी केलेल्या सोयादान्याचे एक पोते घेउन जाऊ लागताच विलास यांनी त्यांना हटकले. यावर ते दोघे ते पोते जागेवर टाकून जवळच्या ऊसात पसार झाले. अशा मजकुराच्या विलास माने यांनी दि. 15 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 511 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : गुजनूर, ता. तुळजापूर येथील चंद्रकांत नागमोरे यांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 14.12.2021 रोजी 14.00 ते 16.00 वा. दरम्यान तोडून घरातल्या कपाटातील सुवर्ण दागिने व 5,000 ₹ रक्कम असा एकुण 70,000 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या चंद्रकांत नागमोरे यांनी दि. 15 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 तुळजापूर : सोलापूर येथील दत्तात्रय नरहरी भैरु हे दि. 14.12.2021 रोजी 21.00 वा. सु. तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदीरात दर्शनासाठी गेले असता गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मनगटावरील 10 ग्रॅम वजनाचे सुवर्ण साखळी चोरली. अशा मजकुराच्या दत्तात्रय भैरु यांनी दि. 15 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web