कोविड- 19 संदर्भातील मनाई आदेश झुगारुन आंदोलन करणाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल

 
Osmanabad police

ढोकी : कोविड- 19 चा संसर्क कमी व्हावा यासाठी शासन व प्रशासनाने विविध मनाई आदेश जारी केले आहेत. ते मनाई आदेश झुगारुन 1) दिपक राजाभाऊ इंगळे 2) शिरोमनी सहदेव घुले, दोघे रा. एकुरगा, ता. लातूर 3)स्वप्नील काळे, ढाकणी, ता. लातुर 4)धिरज ढोरमारे 5)करीम शेख 6)सुरज जावळे 7)रोहीत भिसे 8)विनायक गिरी, सर्व रा. मेंढा, ता. उस्मानाबाद 9)सुशांत आलटे 10)प्रदिप सरपाळे, दोघे, रा. मुरुड यांसह अंदाजे 30 ते 40 लोकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी दि. 10.01.2022 रोजी 12.43 ते 13.30 वा. दरम्यान पळसप फाटा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 465 वर रास्ता रोको आंदोलन केले. यावरुन ढोकी पो.ठा. चे पोलीस अंमलदार- श्रीमंत क्षिरसागर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269, 270 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

सार्वजनिक रस्त्यावर जिवीतास धोकादायकपने मालवाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

कळंब  : विलास महादेव कदम, रा. डिकसळ, ता. कळंब हे दि. 10.01.2022 रोजी 11.00 वा. सु. छ. शिवाजी महाराज चौक, कळंब येथील सार्वजनिक रस्त्यावर मालवाहतुक ॲपेरिक्षा क्र. एम.एच. 03 एएच 4812 मध्ये बॉडीच्या बाहेर सळई आलेल्या स्थितीत जिवीतास धोकादायकपने वाहतूक करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

जुगार विरोधी कारवाई

नळदुर्ग  : मानेवाडी, ता. तुळजापूर येथील सुनिल राजेंद्र पाटोळे हे दि. 10.01.2022 रोजी नळदुर्ग बस स्थानकाच्या पाठीमागील गाळ्यासमोर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 130 ₹ रक्कम बाळगले असतांना नळदुर्ग पोलीसांना आढळले. यावरुन त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 अवैध मद्य विरोधी कारवाई

नळदुर्ग  -  आरळी (खु.), ता. तुळजापूर येथील गुंडाप्पा नागनाथ गायकवाड हे गाव शिवारात 180 मि.ली. क्षमतेच्या 7 बाटल्या देशी- विदेशी मद्य अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना नळदुर्ग पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्याच्या बाटल्या जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web