दाबका शिवारातील पाण्यात स्त्री जातीचे अर्भक फेकले 

 अर्भक बेवारस टाकणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखल
 
Osmanabad police

उमरगा  : अपत्य जन्म लपवण्याच्या उद्देशाने एक मयत स्त्री जातीचे अर्भक अज्ञात व्यक्तीने दि. 09 ऑक्टोबर रोजी 09.00 वा. पुर्वी दाबका शिवारातील पाचफुल येथील पाण्यात टाकून दिलेले आढळले. यावरून उमरगा पो.ठा. चे पोलीस हेडकॉन्स्टेबल- वाल्मिक कोळी यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन अज्ञात व्यक्तीविरुध्द भा.दं.सं. कलम- 318 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरीचे तीन गुन्हे दाखल 

तुळजापूर : अक्षय अशोक पेंदे, रा.शुक्रवार पेठ, तुळजापूर हे दि. 09 ऑक्टोर रोजी रात्री घराचा दरवाजा उघडा ठेउन झोपले असतांना अज्ञात व्यक्तीने 03.00 वा. सु. घरात प्रवेश करुन आतील 7 स्मार्टफोन चोरुन नेले. अशा मजकुराच्या अक्षय पेंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : जितेंद्र अंकुश, रा. उमरगा यांनी त्यांची हिरो होंडा पॅशन प्रो. मोटारसायकल क्र. एम.एच. 26 एबी 5559 ही दि. 08 ऑक्टोबर रोजी 09.00 ते 17.00 वा. दरम्यान उमरगा बसस्थानक परिसरात लावली असता अज्ञाताने ती चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : गोविंद देशमुख, रा. पोहनेर, ता. उस्मानाबाद यांनी त्यांची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एजी 7884 ही दि. 05 ऑक्टोर रोजी 23.00 वा. आपल्या घरासमोर लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती लावल्या जागी न आढळल्याने अज्ञाताने ती चोरुन नेली आहे. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web