धाराशिव : घरमालकीण बरोबर अनैतिक संबंध भोवले, कॉन्स्टेबलची आत्महत्या 

 
d

धाराशिव  : राज्य उत्पादक शुल्क विभागात कॉन्स्टेबल असलेल्या बालाजी बळीराम भंडारे याचे  घर मालकीण  असलेल्या शुभांगी नंदु जगताप या महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. 

मयत नामे-बालाजी बळीराम भंडारे, वय 34 वर्षे, रा. वाडी बामणी, ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.10.08.2023 रोजी 14.00 ते  14.30 वा. सु भाड्याने राहत असलेल्या शुभांगी नंदु जगताप हिचे बेडरुममध्ये साईरामनगर उस्मानाबाद येथे गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे 1) शुभांगी नंदु जगताप, रा. साईरामनगर उस्मानाबाद जि. उस्मानाबाद हिचे त्रासास कंटाळून बालाजी भंडारे यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या नानासाहेब अंबादास लांडे-पवार, वय 48 वर्षे, रा. बामणी ता. जि. उस्मानाबाद यांनी दि. 14.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो ठाणे येथे भा.दं. वि. सं कलम- 306, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


मयत नामे-बालाजी बळीराम भंडारे हे राज्य उत्पादक शुल्क विभागात कॉन्स्टेबल होते. ते  साईराम नगर येथे किरायाने राहत होते त्या दरम्यान घर मालकीण शुभांगी नंदु जगताप  बरोबर अनैतिक  संबंध निर्माण झाले. ही घरमालकीण सतत फोन करुन व अनैतिक संबंध ठेवण्यासाठी पैशाची मागणी करुन त्रास देत होती.सततच्या त्रासास कंटाळून बालाजी भंडारे यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या नानासाहेब अंबादास लांडे-पवार, वय 48 वर्षे, रा. बामणी ता. जि. उस्मानाबाद यांनी दि. 14.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो ठाणे येथे भा.दं. वि. सं कलम- 306, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान ही आत्महत्या नसुन हत्या आहे असा आरोप करीत खुनाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी कुटुंबाने केली आहे. घटनास्थळी अनेक गोष्टी या संशयास्पद असुन महिलेवर गंभीर आरोप केले आहेत. भंडारे यांनी स्वतःच्या रूममध्ये आत्महत्या न करता घरमालकीण शुभांगी हिच्या बेडरूममध्ये कशी केली. घरमालकीण हिने पोलीस किंवा इतरांना न सांगता लवकर प्रेत काढले., असा सवाल नातेवाईकांनी केला आहे. 

From around the web