येरमाळा , उमरगा, बेंबळी येथे हाणामारी

येरमाळा : आरोपी नामे-1)उमेश रकटे, 2)गणेश रकटे, दोघे रा. भिमनगर तेरखेडा ता. वाशी जि. उस्मानाबाद यांनी दि.29.08.2023 रोजी 10.30 वा. सु. तेरखेडा येथुन गावातील बसस्थानक हनुमान मंदीरासमोरील इशीत फिर्यादी नामे- श्रीकांत शाहु शिंदे, वय 30 वर्षे रा. भिमनगर तेरखेडा जि. उस्मानाबाद यांना जुन्या वादाचे कारणावरुन नमुद आरोपीतांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीस तुम्ही येथे येवून लय दादागिरी करायलात तुझा कायदा काय करतो असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कोयत्याने व तलवारीने श्रीकांत शिंदे यांचे दोन्ही हातावर मारुन जखमी केले. तसेच केस करायला गेला तर जिवे ठार मारीन अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी श्रीकांत शिंदे यांनी दि.29.08.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 307, 504, 506, 34.अ.जा.ज.अ. प्र.का कलम 3 (1)(आर)(एस), 3(1)(टी), 3(1)(जी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : आरोपी नामे- 1) राजेश जाधव, रा. एकुरगावाडी, ता. उमरगा 2)सिध्दु उर्फ अजय जाधव, 3) अवि माने दोघे रा. बोळेगाव ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी दि.28.08.2023 रोजी 23.00 वा. सु. एकुरगावाडी शिवारात फिर्यादी नामे- लक्ष्मण ज्ञानोबा काळे, वय 40 वर्षे, रा. माडज, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद यांना नमुद आरोपीतांनी हातातील चाकुने गळ्यावर मारुन गंभीर जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी लक्ष्मण काळे यांनी दि.29.08.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 326,506, 34. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी : आरोपी नामे- भारत भाउराव डोलारे, 2) मनोज भारत डोलारे, 3) समाधान हरी डोलारे4) हरी भाउराव डोलारे, 5)तानाजी मारुती डोलारे, 6)शाहुराज संभाजी माळी, 7) तिरुपती शाहुराज माळी, 8) आकाश शाहुराज माळी, 9) प्रभुलिंग मल्लिकार्जुन वाघाळे, 10) अरुण सुग्रीव कोळगे, 11) श्रीकांत रतन कौळगे, दोघे सर्व रा. केशेगाव यांनी दि. 28.05.2023 रोजी 10.00 ते 10.30 वा. सु. केशेगाव शिवार येथे फिर्यादी नामे- अजयकुमार नंदकुमार डोलारे, वय 28 वर्षे, रा. केशेगाव ता.जि. उस्मानाबाद यांना व त्यांची आई यांना नमुद आरोपीतांनी घरात घुसुन तु आमचे विरुध्द सोसायटीच्या निवडणूकीत प्रचार का केला असे म्हणून संगणमताने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी काठीने मारहान केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी अजयकुमार डोलारे यांनी दि.29.08.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 323, 504, 506, 427, 452, 143, 147, 149. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देणाऱ्यावर गुन्हा दाखल
उमरगा : आरोपी नामे-1) सलिम इमाम शेख,वय 45 वर्षे, रा. इंदीरानगर, औसा जि. लातुर 2) पाशा ईस्माईल कुरेशी, वय 60 वर्षे रा. अहमद नगर औसा ता. औसा जि. लातुर यांनी दि.29.08.2023 रोजी 13.30 वा.सु. भुसनी पाटी येथे पिकअप क्र एमएच 24 एबी 6324 मध्ये क्षेमतेपेक्षा जास्त 9 जनावरे पिकअपमध्ये दाटीवाटीने भरुन वाहतुक करत असताना उमरगा पोलीसांना मिळून आले. अशा मजकुराच्या पोलीस ठाणे उमरगाचे पोलीस हवालदार/1146 वाल्मीक अगतराव कोळी यांनी दि.29.08.2023 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द पो. ठाणे उमरगा येथे प्राण्यांना निर्दयपणे वागणूक कायदा कलम 11 (ड)(ई) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधि 5, 5 (ए), 5 (ब) 9 सह प्राण्याचे परिवहन अधि कलम 47, 54, 56 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.