दाऊतपूर,आरणी, बेंबळी  येथे हाणामारी 

 
crime

ढोकी  : आरोपी नामे-1) साहेबराव विश्वनाथ पांढरे, 2) बालाजी नामदेव पांढरे, 3) विकास साहेबराव पांढरे, 4) राजाभाउ अजिनाथ पांढरे, 5) परमेश्वर साहेबराव पांढरे, 6) अजिनाथ विश्वनाथ पांढरे, 7)स्वाती राजाभाउ पांढरे 8) छायाबाई साहेबराव पांढरे 9) सखुबाई नामदेव पांढरे सर्व रा. दाउतपूर ता. जि. उस्मानाबाद यांनी शेतातुन जाण्याचे कारणावरुन दि.20.07.2023 रोजी 17.00 वा. सु. दाउतपूर शिवार फिर्यादी यांचे शेतात फिर्यादी नामे- जगदिश भास्कर देवकर, वय 31 वर्षे रा. दाउतपूर, ता.जि. उस्मानाबाद यांनी  आरोपी यांना तुम्ही  आमच्या वावरातुन आमचे पिकाचे नुकसान करीत का जाता असे विचारले असता फियादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने डोक्यात मारहान करुन जखमी केले. व फिर्यादीचे  वडील, चुलती व चुलता यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या जगदिश देवकर यांनी दि.25.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324,  323, 504, 506, 143, 147, 148, 149  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : आरोपी नामे- 1) उज्वला घनश्याम शिंदे, 2) घनश्याम विठ्ठल शिंदे, 3) कालीदास शिंदे तिघे रा. आरणी ता. जि. उस्मानाबाद यांनी अंगणात कचरा टाकण्याचे कारणावरुन दि.25.07.2023 रोजी 07.00 वा. सु. आरणी येथे फिर्यादीच्या घरासमोर फिर्यादी नामे- सविता बालाजी लोहार, वय 31 वर्षे रा. आरणी, ता.जि. उस्मानाबाद यांना अंगणात कचरा का टाकला असे विचारलेवरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, सळईने  मारहाण केली. यात सविता यांचे डोक्यात, डावे गालावर, डावे हातावर, उजवे गुडघ्यावर मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या सविता लोहार यांनी दि.25.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324,  323, 504, 34  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : आरोपी नामे- 1) सविता बालाजी लोहार 2) बालाजी तुकाराम  लोहार, रा. आरणी ता. जि. उस्मानाबाद यांनी अंगणात कचरा टाकण्याचे कारणावरुन दि.25.07.2023 रोजी 07.00 वा. सु. आरणी येथे फिर्यादीच्या घरासमोर फिर्यादी नामे-उज्वला घनशाम शिंदे, वय 35 वर्षे रा. आरणी, ता.जि. उस्मानाबाद यांना अंगणात कचरा का टाकला असे विचारले असता आरोपी म्हणाली ही जागा माझी आहे असे म्हणुन फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण केली. तसेच उज्वला यांचे डोक्यात दगडाने मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या उज्वला शिंदे यांनी दि.25.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324,  323, 504, 34  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी : आरोपी नामे- 1) महेबुब तुराबखॉ पठाण 2) सद्दाम तुराबखॅ पठाण, रा. बेंबळी ता. जि. उस्मानाबाद यांनी शेतात शेळ्या चारण्याचे कारणावरुन दि.24.07.2023 रोजी 15.00 ते 15.30 वा. सु. बेंबळी शिवार शेतगट नं  53 येथे फिर्यादी नामे-बस्वराज भिमाशंकर गिरवलकर, वय 64 वर्षे रा. बेंबळी ता.जि. उस्मानाबाद यांनी आमचे शेत पेरले आहे शेतात शेळ्या आणु नका असे म्हणाले असता आरोपी यांनी तु आम्हाला कोण सांगणारा असे म्हणुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कत्तीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बस्वराज गिरवलकर यांनी दि.25.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                                                                   

From around the web