काटगावमध्ये घराच्या बांधकामावरून हाणामारी 

 
crime

नळदुर्ग  : काटगाव, ता. तुळजापूर येथील- सुर्यकांत खोबरे, बाबुराव खोबरे यांनी  घराची भिंत व पायऱ्या बांधून देण्याचे कारणावरुन दि.02.07.2023 रोजी 10.00 वा.सु. काटगाव येथे ग्रामपंचायत कार्यालया समोर गावकरी- शिवराज सिध्दलिंग खोबरे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. शिवराज यांचे बचावास त्यांचे भाउ आला असता त्यासही शिवीगाळ करुन मारहान केली. अशा मजकुराच्या शिवराज खोबरे यांनी दि.05.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 वडगाव नळी,मध्ये म्हैसी चोरीस 

भूम  : वडगाव नळी, ता. भुम येथील- शाम शहाजी गायकवाड, वय 32 वर्षे, यांचा वडगाव नळी श्विारातील शेतातील गोठ्यात बांधलेल्या 5 म्हशी अंदाजे 1,80,000 ₹ किंमतीच्या ह्या दि.30.06.2023 रोजी 22.00 ते 01.07.2023 रोजी 06.00 वा. सु अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या शाम गायकवाड यांनी दि.05.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंद

तुळजापूर  : तुळजापूर पो.ठा. चे पथक दि. 04.07.2023 रोजी 10.30 वा. सु. आरधवाडी परिसरातील हॉटेल जगत जननी तुळजापूर पेट्रोलिंगला असताना आरधवाडी, श्री. तुळजाभवानी मंदीराच्या पाठीमागे, ता. तुळजापूर येथील- अक्षय नानासाहेब गायकवाड हा लोकांचे जिवीत धोक्यात येईल असे अंदाजे 3.5 इंच देशी बनावटीचे पिस्टल अंदाजे 15,000 ₹ किंमतीचे हे बेकायदेशीररीत्या कब्जात बाळगून असताना पथकास आढळला. यावर पथकाने अक्षय यास ताब्यात घेउन त्यांच्या जवळील ती पिस्टल जप्त करुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- 3, 25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 

From around the web