अचलेर : आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
crime

मुरुम  : अचलेर तांडा, ता. लोहारा येथील- ओमनाथ रामराव राठोड यांनी  दि.05.02.2023 रोजी  00.30 वा. सु. आपल्या राहत घरी कौटुंबिक काराणावरुन ओमनाथ यांनी ब्लेडने डाव्या बाजूस छातीवर मारुन घेऊन दुखापत करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या मुरुम पो.ठा.चे पोलीस अमंलदार अजय माळी यांनी दि.05.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 309 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 मारहान

नळदुर्ग : उमरगा चिवरी येथील- संभाजी तानाजी कदम, हे दि01.02.2023 रोजी 19.30 वा. सु. सार्वजनिक कट्यावर उमरगा चिवरी येथे असताना यावेळी गावकरी- शेकाप्पा घोडके, बळीराम दुधभाते, साधु घोडके, बिभीषन दुधभाते यांनी संगणमताने जुण्या भांडणाचे कारणावरुन संभाजी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, मारहान करुन लोखंडी रॉडने संभाजी यांच्या डावे पायाचे घोट्यावर मारुन हाड फॅक्चर करुन गंभीर जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संभाजी कदम यांनी दि. 05.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web