उस्मानाबादच्या जिल्हा कारागृहात आरोपीची आत्महत्या 

बाळा ढेकणे मृत्यू प्रकरणाची माहिती दाखल करण्याचे आवाहन
 
Osmanabad police

उस्मानाबाद -  उस्मानाबादच्या जिल्हा कारागृहात एका आरोपीने एल बॅरेक परिसरामधील बंद शौचालयाच्या पाठीमागे खिडकीस गळफास घेऊन केल्याचे उघडकीस आले आहे. 


येथील जिल्हा कारागृहात हनुमंत ऊर्फ बाळा सदाशिव ढेकणे,(वय-25 वर्ष, रा.कौडगाव बावी, ता.जि.उस्मानाबाद) यांचा जिल्हा कारागृहातील एल बॅरेक परिसरामधील बंद शौचालयाच्या पाठीमागे खिडकीस गळफास घेऊन, दि.08 ऑगस्ट 2017 रोजी संशयास्पद मृत्यू झाल्याने, या प्रकरणाची फौजदारी प्रक्रिया संहिता 1973(2/1974) मधील तरतुदीनुसार चौकशी करण्यासाठी येथील उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांची नेमणूक जिल्हा दंडाधिकारी यांनी केली आहे.

या मयताच्या नातेवाईकास त्याच्या मृत्यूबाबत काही माहिती किंवा त्यांचे काही म्हणणे असेल, तर तसे त्यांनी त्यांच्या सबळ पुराव्यासह दि.21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी ठिक 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत या कार्यालयास हजर राहून आपले म्हणणे पुराव्यानिशी दाखल करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्री.खरमाटे यांनी केले आहे.

From around the web