ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार 

 
crime

नळदुर्ग  : नंदगुल तांडा, ता. तुळजापूर येथील अर्जुन गोविंद राठोड, वय 19 वर्षे हा दि. 04.03.2022 रोजी 09.30 वा. सु. नळदुर्ग शिवारातील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 जे 6190 ही चालवत जात होता. यावेळी अज्ञात चालकाने ट्रक क्र. आर.जे. 32 जेसी 0545 हा चुकीच्या दिशेने निष्काळजीपने चालवल्याने अर्जुन चालवत असलेल्या नमूद मो.सा. ला समोरुन धडकला. या अपघातात अर्जुन राठोड हा गंभीर जखमी होउन मयत झाला. या अपघातानंतर नमूद ट्रकचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचे पिता- गोविंद लोकु राठोड यांनी दि. 05.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


मुरूम : धोकादायकरित्या वाहन चालवणाऱ्या दोन  चालकांवर गुन्हे दाखल

मुरुम  : कंटेकुर, ता. उमरगा येथील राजकुमार बिराजदार हे दि. 05.03.2022 रोजी 12.00 वा. सु. बेळंब बस स्थानकासमोरील रस्त्यावर कमांडर जिप क्र. एम.एच. 04 एएस 3076 च्या दोन्ही बाजूस पीव्हीसी पाईप बांधुन धोकादायकरित्या वाहतूक करत होते. तर ओमकार कुंभार हे बेळंब येथील नदी पुलावरुन टाटा सुमो वाहन क्र. एम.एच. 16 एएस 2799 हे जिवीतास धोका होईल अशारितीने चालवत होते.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web