उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या पाच घटना 

 
crime

 येरमाळा : इंदीरानगर, कळंब येथील- आश्रुबा जगन्नाथ शिंपले, वय 26 वर्षे हे तुळजापूर येथे ज्योत आणनेकामी दि. 26.09.2022 रोजी 02.00 ते 03.00 वा. सु. मलकापुर फाटा येथील राष्ट्रीय महामार्गावरुन मोटारसायकल चालवत जात होते. दरम्यान एका मोटारसायकलवर आलेल्या चार अनोळखी ईसमांनी त्यांची मो.सा. आश्रुबा यांच्या मो.सा. ला समोर आडवी लाउन त्यांच्याजवळील मोबाईल फोन व 22,100 ₹ रोख रक्कम असा एकुण 37,100 ₹ चा जबरीने घेउन ते चौघे तेथून पसार झाले. अशा मजकुराच्या आश्रुबा शिंपले यांनी दि. 27.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
कळंब : इंदिरानगर, कळंब येथील- गणेश नारायण लोकरे यांनी गावकरी- सुरेश करंजकर यांच्या कळंब शिवारातील शेतातील कुकूटपालन शेडजवळ ठेवलेले 20 फुट लांबीचे लोखंडी 3 गज, 100 मीटर नळी व बाजेच्या लोखंडी नळ्या असे एकुणे 2,900 ₹ किंमतीचे साहित्य दि. 22.09.2022 रोजी 20.00 ते 22.00 वा.दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या गणेश लोकरे यांनी दि. 27.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

उस्मानाबाद  : शिंगोली, ता. उस्मानाबाद येथीले- विश्वजित शंकर उबाळे यांच्या ताब्यातील टीव्हीएस स्टार सिटी मोटारसायकल क्र. एम.एच. 45 डब्ल्यु 5277 अंदाजे 25,000 ₹ किंमतीची दि. 24.09.2022 रोजी 13.30 वा. ते 13.45 वा. सु. शिंगोली येथील सरस्वती शाळेच्या आवारातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या विश्वजित उबाळे यांनी दि. 27.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

ढोकी  : दत्तनगर, ढोकी येथील- विकी धनंजय लोमटे यांची हिरो होंडा पॅशन प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 25 ए 9515 अंदाजे 20,000 ₹ किंमतीची दि. 26.09.2022 रोजी 16.00 वा. सु. ढोकी पेट्रोल पंप चौकातील ॲक्सीस बँक एटीएम केंद्रासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या विकी लोमटे यांनी दि. 27.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : मस्सा (खुर्द), ता. कळंब येथील- महादेव मच्छिंद्र तांदळे यांची होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एए 1352 अंदाजे 25,000 ₹ किंमतीची दि. 25.09.2022 रोजी 23.30 ते दि. 26.09.2022 रोजी 05.00 वा. दरम्यान गावातील कामधेनु दुकानासमोरून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या महादेव तांदळे यांनी दि. 27.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीसांच्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान चोरीचे कपडे जप्त

वाशी :  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने दि.27- 28.06.2022 रोजी दरम्यानच्या रात्री जिल्हाभरात कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले होते. यादरम्यान वाशी पोलीस ठाण्याच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की, रामकुंड येथील भागवत पंजा शिंदे हे आपल्या घरी चोरीचे कपडे बाळगून आहेत. यावर वाशी पो.ठा. च्या पथकाने 00.50 वा. सु. नमूद ठिकाणी छापा टाकला असता भागवत शिंदे हे आपल्या घरात वेगवेगळ्या कंपनीचे व किंमतीचे जिन्स पॅन्ट 22 नग, कॉटन पॅन्ट 15 नग, शर्ट 27 नग, लेडीज टॉप व पॅन्ट 18 नग व साड्या 11 नग असे एकुण 1,02,836 ₹ किंमतीचे कपडे बाळगलेले आढळले. यावर पथकाने नमूद कपड्यांच्या मालकी- ताबा विषयी भागवत शिंदे यांच्याकडे विचारपुस केली असता ते मालकी व ताबा शाबीत न करता पोलीसांच्या प्रश्नास उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याने शिंदे यांनी तो माल कोठूनतरी चोरुन आणल्याचा पोलीसांचा संशय बळावल्याने शिंदे यांस नमूद मालासह ताब्यात घेउन त्यांच्यावर वाशी पो.ठा. येथे गुन्हा क्र. 247/2022 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 124 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे.  सदरची कामगीरी वाशी पो.ठा. चे पोनि- . बुधवंत, पोहेकॉ- कुटे, पोकॉ- करवर, सय्यद, सुरवसे, जगताप यांच्या पथकाने केली आहे.

From around the web