वाशी तालुक्यात गाईला पाणी पाजण्यासाठी ओढ्यावर गेलेल्या मुलीवर  लैंगिक अत्याचार

 
crime

वाशी  : एका गावातील एक 20 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) ही दि.27.12.2022 रोजी 13.00 वा.सु.गाईला पाणी पाजण्यासाठी ओढ्यावर गेली होती.यावेळी गावातील एका तरुणाने तिला उसाचे पिकात नेवून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच दि.28.12.2022 रोजी 14.00 वा.सु.पहिल्या तरूणासह  अन्य पाच तरूणाने तीला चाकुचा धाक दाखवून तिच्यावर पुन्हा लैंगीक अत्याचार केला. या दरम्यान त्यांच्यातील एका तरूणाने सदर घटनेचे मोबाईलवर छायाचित्रण करून प्रसारीत केले.अशा मजकुराच्या पिडीतीने दि.29.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं.कलम-376,376(ड),506,34 सह ITact कलम 67 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


खून 

शिराढोण  :देवधानोरा,ता. कळंब येथील- पवन रामभाउ वटाणे यांनी जुन्या आर्थीक व्यवहाराच्या कारणावरून दि.27.12.2022 रोजी 10.00 वा  व 19.00 वा.सु. गावकरी बाजीराव पांडूरंग बोंदर, वय- 65 वर्ष यांना गंभीर मारहाण केल्यास ते मरण पावतील याची जाणीव असताना ही बाजीराव यांच्या घरासमोर छातीवर,पोटावर,जोर जोरात मारहाण केली.यात बाजीराव यांना रक्ताची उलटी होउन ते मरण पावले.अशा मजकुराच्या पांडुरंग बोदंर यांनी दि.29.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं.कलम- 304,504,506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 

From around the web