निफ्टी ६४ तर सेन्सेक्सने घेतली २२७ अंकांची बढत

वाहन आणि वित्तीय क्षेत्राची दमदार कामगिरी
 
 
निफ्टी ६४ तर सेन्सेक्सने घेतली २२७ अंकांची बढत

मुंबई -  वाहन आणि वित्तीय शेअर्सचा प्रमुख आधार मिळाल्याने बेंचमार्क निर्देशांक सलग तिसऱ्या दिवशी हिरव्या रंगात स्थिरावले. आजच्या व्यापारी सत्रात निफ्टी ०.५०% किंवा ६४.०५ अंकांनी वधारला. १२,९०० ची पातळी ओलांडत तो १२,९३८.२५ अंकांवर स्थिरावला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.५२ टक्के किंवा २२७.३४ अंकांनी वाढला व तो ४४,१८०.०५ अंकांवर स्थिरावला.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात एमअँडएम (१०.३६%), टाटा मोटर्स (९.४९%), बजाज फिनसर्व्ह (६.४६%), एलअँडटी (५.८२%) आणि इंडसइंड बँक (५.९१%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर दुसरीकडे बीपीसीएल (२.९३%), एचयुएल (१.९६%), डॉ. रेड्डीज (१.६८%), हिरो मोटोकॉर्प (१.४०%) आणि भारती एअरटेल (१.३९%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.

सेक्टरल पातळीवर, निफ्टी ऑटोमध्ये ३% वाढ झाली तर बँक आणि वित्तीय सेवा निर्देशांकाने १.९% व १.३% अशी अनुक्रमे वाढ झाली. बीएसई मिडकॅप ११.२६% नी वाढले तर बीएसई स्मॉलकॅपमध्ये ०.९० % ची वाढ झाली.

आयआयएफएल फायनान्स लि.: आयआयएफएल फायनान्स लिमिटेडचे शेअर्स ५.५१% नी वाढले. या नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनीने पुढील बैठकीत शेअर्सच्या बायबॅक प्रस्तावावर विचार केला. त्यानंतर स्क्रिपची किंमत ११८.७५ रुपये झाली.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड: कंपनीने तेलंगणात के२ सीरीजचे नवे ट्रॅक्टर तयार करण्याचे जाहीर केले. के२ द्वारे एमअँडएमच्या झहीराबाद येथील प्रकल्पात १०० कोटी रुपयांची वाढीव गुंतवणूक येईल. त्यामुळे येथील प्रकल्पात रोजगारही दुप्पट होईल. कंपनीच्या शएअर्समध्ये १०.३६% ची वाढ झाली व त्यांनी ७०३.२५ रुपयांवर व्यापार केला.

लार्सन अँड टर्बो लि.: एलअँडटीने टाटा स्टीलकडून कोमात्सू खाण इक्विपमेंटची ४६ युनिटची ऑर्डर मिळवली. हा आतापर्यंतचा कंपनीचा सर्वात मोठा बांधकाम व खाण व्यवसाय करार असेल. कंपनीचे शेअर्स ५.८२% नी वाढले व त्यांनी १,१४३.८५ रुपयांवर व्यापार केला.

लक्ष्मी विलास बँक लिमिटेड.: वित्त मंत्रालयाने १७ नोव्हेंबर २०२० ते १६ डिसेंबर २०२० पर्यंत बँकेला स्थगिती दिली होती. परिणामी कंपनीचे शएअर्स १९.९४% नी खाली आले व त्यांनी १२.४५ रुपयांवर व्यापार केला.

भारतीय रुपया: देशांतर्गत इक्विटी बाजारात विशेष व्यापार न झाल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने किरकोळ घसरण घेत ७४.४६ रुपयांचे मूल्य कमावले.

जागतिक व्यापार: कोव्हिड१-९ च्या रुग्णांत धोकादायक पद्धतीने वाढ झाल्याने जागतिक बाजारात संमिश्र संकेत दिसून आले. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नव्याने आर्थिक लॉकडाऊन आणि कमकुवत रिटेल विक्रीची भीती वाढली. नॅसडॅकचे शेअर्स ०.२१% नी घसरले, एफटीएसई १०० चे शेअर्स ०.१३% नी घसरले व निक्केई २२५ चे शेअर्स १.१०% नी कमी झाले. तर याउलट एफटीएई एमआयबी व हँगसेंगचे शेअर्स अनुक्रमे ०.६६% आणि ०.४९% नी वाढले.

From around the web