दिवाळीनिमित्त टिकीट रिझर्वेशन व रिफंड करण्याबाबत रेल्वेने केला बदल

 
दिवाळीनिमित्त टिकीट रिझर्वेशन व रिफंड करण्याबाबत रेल्वेने केला बदल

नवी दिल्ली  -  दिवाळी तसेच छठपूजा यांसारखे भारतीय सण तोंडावर आले असता रेल्वेनेही नागरिकांच्या सोयीसीठी काही स्पेशल ट्रेन्सची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. भारतीय रेल्वेने देशभरात विशेषतः युपी, बिहारकडील जनतेसाठी अधिकाधिक ट्रेन सुरू केल्या आहेत याशिवाय रिझर्वेशन व रिफंटच्या नियमांतही थोडेसे बदल केलेले आहेत.

भारतीय रेल्वेच्या नव्या नियमानुसार ट्रेन निर्धारित स्टेशनहून निघायच्या अर्धातास आधी रिझर्वेशन चार्ट तयार करणार आहे तर कोरोना काळात प्रवाश्यांचा वेळ वाचण्यासाठी ट्रेन निघतेवेळी पाच ते तीस मिनीट म्हणजेच लवकरात लवकर दुसरा चार्ट तयार करणार आहे. तसेच ट्रेन सुटायच्या आधी तीस मिनीटांत बुकिंग करण्यासही ऑनलाईन व ऑफलाईन मुभा दिलेली आहे. याशिवाय तिकीट रद्द करायचे असल्यास तेथेही ट्रेन निघायच्या तीस मिनीट आधीचा नियम लावण्यात आलेला आहे. 
 

From around the web