व्हाट्सएपवर चॅटिंगसह आता पेमेंटही करा

 
व्हाट्सएपवर चॅटिंगसह आता पेमेंटही करा

सोशल मिडीया वापरणाऱ्यांना आणि त्यात लोकप्रिय असणाऱ्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाटसएपने एक नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे ती म्हणजे चॅटिंग करता करता तेथूनच कुणालाही सहजपणे रुपये पाठवता येणार आहेत तेही कुठलाही चार्जेस न आकारता. व्हाट्सएप पे असा नवा फीचर व्हाट्सएपने आणलेला आहे.

 अगदी 2018 सालापासून व्हाटसएपकडून हे फीचर्स लोंच करण्याची जोरदार तयारी सुरू होती अखेर बीटा टेस्टिंग पूर्ण होऊन युजर्सना आता वापरायची परवानगी मिळाली आहे. नुकतेच व्हाट्सएपला ही पेमेंट सर्विस भारतात सुरू करण्यासाठी नॅशनल पेमॆंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI  कडून हिरवा कंदिल मिळाला आहे. 

तूर्तास यालाही एक मर्यादा घालून दिलेली आहे त्यानुसार व्हाट्सएप पे च्या पहिल्या टप्प्यात NPCI  ने दोन कोटी युजर्सला एक कॅप असे सेटिंग केलेले आहे. म्हणजेच चाळीस करोड युजर्स मधील केवळ दोन कोटी युजर्सनाच हा व्हाट्सएपमधील पेमेंटचा ऑप्शन मिळालेला आहे.

From around the web