भारत - अमेरिका संबंध दृढ करणारे शिलेदार जो बायडन

 
भारत - अमेरिका संबंध दृढ करणारे शिलेदार जो बायडन

नवी दिल्ली - अमेरिकेतील नुकत्याच झालेल्या सत्तापरिवर्तनासोबत प्रत्येक देश आपापल्या परिने राष्ट्रपती जो बायडन यांच्या आगामी कार्यकाळाबाबत काही चांगले अंदाज बांधत आहेत. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन हे भारत देशाबाबत अधिक सकारात्मक असल्याचे म्हंटले जात आहे. जर मागील काही वर्षांच्या बाबतीत विचार करायचे झाले तर भारतासह जो बायडन यांचे संबंध खूपच चांगले दिसून आले आहेत.

कारण भारत अमेरिका द्विपक्षिय संबंध चांगले राखण्यासाठी 1970 च्या सुमारास जो बायडन यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. 2008 साली झालेल्या भारत अमेरिका असैन्य परमाणु कराराला सिनेट कडून मंजूरी मिळवण्याबाबतचे शिलेदार हे जो बायडनच होते. भारत अमेरिका सिव्हिल न्युक्लिअर डील, 500 बिलियन अमेरिकन डॉलरच्या द्विपक्षिय व्यापारातही बायडन यांची महत्त्वाची भूमिका होती. यासह बायडन यांचे भारतीय अमेरिकन्यसोबतही पूर्वीपीसूनच जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

जो बायडन हे भारत देशाचे एवढे खंदे समर्थक आहेत की, त्यांनी 2001 साली अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्रपती जॉर्ज डब्लू बुश यांना पत्र लिहून भारतावर घातलेले  अनेक आर्थिक प्रतिबंध हटवण्याची मागणी लावून धरलेली होती. जो बायडन हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले राष्ट्रपती पदाचे उमेदवार ठरले ज्यांना सर्वाधिक्याने मते प्राप्त झाली, त्यांनी ओबामा यांचाही मत मिळवण्याचा रेकोर्ड मोडीत काढला आहे. ओबामा यांच्या कार्यकाळात उपराष्ट्रपती पदाची जबाबदारी उत्तमरित्या पेलली होती त्यावेळी ओबामांसह बायडन यांनी भारत व अमेरिका देशांतील संबंध मैत्रीपूर्ण व विश्वसनीय कसे रहातील यावर भर दिलेला होता. बायडन यांनी ट्रम्प यांच्या एच – 1 बी व्हिजा रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. हा व्हिजा रद्द केल्याने काही काळ भारतीय आयटी प्रोफेशनल्सचे मोठे नुकसान झाले होते.

जो बायडन यांच्या कोअर टीममध्ये भारतीयांची संख्या बरीच आहे. उपराष्ट्रपती ठरलेल्या कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या आहेत तर बायडन यांचे दोन मुख्य सल्लागारही भारतीय वंशाचेच आहेत. बायडन यांनी निवडूकी आधीही स्पष्ट केलेले होते की, बायडन प्रशासन हे कायमच अमेरिका भारताबाबतच्या मजबूत संबंधांना प्राधान्य दिले जाणार आहे. दरम्यान भारताच्या पंतप्रधानांनीसुद्धा जो बायडन यांना राष्ट्राध्यक्ष पदाच्या शुभेच्छा देत भारत अमेरिकेचे संबंध दृढ करण्यात बायडन यांचा खूपच मोठा वाटा असल्याचे स्पष्ट केले तसेच दविपक्षीय संबंध आणखी चांगले करण्यात आमची तुम्हाला साथ मिळेल हेही नमूद केले.

From around the web