भारतीय निर्देशांक विक्रमी स्थितीत; सेन्सेक्सची ५०० अंकांनी उसळी
मुंबई - आयटी, मेटल आणि फार्मा स्टॉक्स क्षेत्रातील नफ्यामुळे बेंचमार्क निर्देशांक मंगळवारी विक्रमी उच्चांकावर स्थिरावला. निफ्टीने १.०८% किंवा १४०.१० अंकांची वृद्धी घेतली. तो १३,००० च्या पातळीपुढे म्हणजेच १३,१०९.०५ अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १.१५% किंवा ५०५.७२ अंकांनी वधारल्यानंतर ४४,६५५.४४ अंकांवर स्थिरावला. आज जवळपास १८६९ शेअर्सनी नफा कमावला, ९७४ शेअर्सची घसरण झाली तर १६९ शेअर्स स्थिर राहिले.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात गेल (७.९४%), सन फार्मा (५.७४%), इंडसइंड बँक (४.९४%), टेक महिंद्रा (३.७९%) आणि युपीएल (३.९०%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. याउलट नेस्ले (२.५७%), कोटक बँक (१.६३%), टायटन (१.३४%), बजाज फायनान्स (१.१२%) आणि एचडीएफसी बँक (०.८२%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.
क्षेत्रांचा विचार करता, पीएसयू बँक इंडेक्स ३% नी वाढला तर सर्व सेक्टरल निर्देशांक हिरव्या रंगात दिसून आले. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप अनुक्रमे ०.९४% आणि ०.८२% नी वधारले.
ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लि.: ग्लेनमार्क फार्मा कंपनीचे स्टॉक्स १.२०% नी वाढले व त्यांनी ४७७.०५ रुपयांवर व्यापार केला. कंपनीला अॅक्सीटिनिब टॅबलेटसाठी यूएसएफडीएची तात्पुरती मंजुरी मिळाली. किडनी कँसरच्या उपचारासाठी या टॅबलेटचा वापर होतो.
लुपिन लि.: विल्सन्स डिसीज आणि गंभीर रुमेटोइड संधीवातग्रस्त रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या पेनिसिलिन कंपनीला यूएसएफडीएची मंजुरी मिळाली. कंपनीच्या शेअर्समध्ये २.२७% नी वाढ झाली आणि ९१२.०० रुपयांवर व्यापार केला.
डीएलएफ लि.: डीएलएफ लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये ४.२२% नी वाढ झाली वव त्यांनी १९५.१० रुपयांवर व्यापार केला. रिअल इस्टेट कंपनीने गुरुग्राममधील ३०० कोटी रुपये किंमतीचे जवळपास ९०% स्वतंत्र मजले विकण्याचे जाहीर केले. त्यानंतर हे परिणाम दिसून आले.
बजाज ऑटो लि.: बजाज ऑटोने नोव्हेंबर २०२० मध्ये एकूण विक्रीत ५% वाढ नोंदवली. कंपनीच्या देशांतर्गत विक्रीत ४% घट झाली व निर्यातीत १४% वाढ झाली. दुचाकी व तीनचाकी वाहन उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये २.१६% नी वाढ झाली व त्यांनी ३,२४२.०० रुपयांवर व्यापार केला.
महिंद्रा अँड महिंद्र लि.: कंपनीच्या ट्रॅक्टर विक्रीत ५६% वाढ झाली असून ट्रॅक्टरच्या विक्रीत ७९% वाढ झाली. ती १,१०७ युनिट एवढी झाली. कंपनीच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत २४% वाढ झाली व ती १८,२१२ युनिट एवढी झाली. कंपनीचे स्टॉक्स १.४७% नी वाढले व त्यांनी ७३२.६० रुपयांवर व्यापार केला.
भारतीय रुपया: देशांतर्गत इक्विटीमध्ये खरेदी दिसून आल्यामुळे भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ५० नी वाढला व त्याने ७३.५५ रुपये मूल्य गाठले.
जागतिक बाजार: कोव्हिड आजारावर लस निर्माण होण्याचा आशावाद गुंतवणूकदारांमध्ये असल्यामुळे जागतिक बाजार हिरव्या रंगात दिसून आला. सर्व प्रमुख निर्देशांक उच्चांकी स्थितीत नोंदवले गेलले. एफटीएसई एमआयबी ०.२७%, एफटीएसई १०० चे शएअर्स २.००%, निक्केई २२५ चे शेअर्स १.३४% तर हँगसेंगचे शेअर्स ०.८६% नी वाढले.