भारतात कोरोना रुग्णांचा आकडा तीनशे च्या पुढे

 
भारतात कोरोना रुग्णांचा आकडा तीनशे च्या पुढे

नवी दिल्ली - जगभर हाहाकार माजविणाऱ्या  कोरोना व्हायरसचा भारतात विळखा वाढत चालला आहे. भारत सरकारच्या वेबसाइट 'covidout.in' च्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूच्या ((COVID-19)) पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ३००  च्या पुढे गेली आहे. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत देशात एकूण 301 घटनांची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव  अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, आजपासून देशभरातील 111 प्रयोगशाळांमध्ये कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात येणार आहे.  भारतीय आणि इतर देशांतील 1600 लोकांना कॉरंटाईन सेंटर मध्ये ठेवण्यात आले आहे. आज 262 लोक रोम, इटलीहून परत येतील आणि त्यांना कॉरंटाईन सेंटर ठेवले जाईल. त्यातील बहुतेक विद्यार्थी आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील असा:

• पिंपरी चिंचवड मनपा 12
• पुणे मनपा 11 (21 मार्च रोजी 2 रुग्ण आढळले)
• मुंबई 19 (21 रोजी ८ रुग्ण आढळले)
• नागपूर 04
• यवतमाळ, कल्याण प्रत्येकी 04 (21 मार्च रोजी प्रत्येकी 1 रुग्ण आढळले)
• नवी मुंबई 03
• अहमदनगर 02
• पनवेल, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी प्रत्येकी 1

एकूण 64 (मुंबईमध्ये एक मृत्यू)

From around the web