कोरोना विषाणू (कोविड 19) चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी
May 15, 2020, 22:14 IST
उन्हाळा (ग्रीष्मऋतू) :-
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येकाने स्वत:ची बाहेर जाताना किंवा गर्दी मध्ये जाताना मास्क लावणे, सॅनिटाझरचा वापरकरणे, लिक्वीड सोपनी हात धुणे इत्यादी बाबत आपण सगळेच काळजी घेत आहोत. त्याच बरोबर प्रत्येक व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढणे तितकीच आवश्यक आहे. रोजच्या जेवणामध्ये सकस अन्न आपण ग्रहण करतो. स्वच्छ भाजी, कडधान्य, फळ इत्यादीचा वापरही करतो,परंतु आता ऋतू बदल होत आहे. उन्हाळ्या मध्ये आपण सगळ्यांनी आपली प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी तसेच आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आयुर्वेदातील साध्या साध्या उपाया पासून आपण स्वत:चा बचाव करु शकतो.तसेच आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे आपल्या आहारामध्ये पुढील गोष्टीचा समावेश केला तर निश्चितच आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवू शकतो.
सामान्यउपाय :-
· ब्रश केल्यावर चिमूटभर मीठ घेवून दात व हिरड्यांना लावावे. त्यामुळे जमलेला घशातील कफ निघून जाईल.
· सकाळी उठल्यावर अर्धा ग्लास गरम पाणी प्यावे.
· रोज सकाळी 30 मिनिटे व्यायाम करावा (योगासन, प्राणायाम, ध्यान (Meditation) करावे.
· सकाळी 8 च्या पूर्वी चहा सारखा काढा करुन प्यावा (सुंठ, मिरे, पिंपळी, (त्रिकटू) तुळसी, दालचिनी यांचा अर्धा कप काढा).
. जीवणीय शक्ती वाढविणे, रोग प्रतिकार क्षमता वाढविणे.
सुवर्ण प्राशन :-
· सारस्वतारिष्ट सुवर्णयुक्त-लहान मुलांना (6 महिने ते 12 वर्ष पर्यंतच्या) चार चमचे पाण्या मध्ये एक थेंब घालून घ्यावा.सारस्वतारिष्ट सुवर्ण युक्त-(नागार्जुन फार्मसी,केरळ),शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय,उस्मानाबाद,बालरोग विभागात सुवर्ण प्राशन उपलब्ध आहे.
· शतावरी,जेष्ठमध,अश्वगंधा,गुळवेल,आमलकी(आवळा)सम भाग पावडर करुन 2 वेळा 2-2 ग्रॅम खावे.
· एक-एक थेंब तीळ तेल नाकात घालावे. (नस्य), तूप, नारळाचे तेल सकाळी व संध्याकाळी.
· घसा खव खवत असल्यास मिठ व चिमूट भर टंकण(बोरॅक्स)पावडर (गप्ड्रप)गुळण्या करणे व कंठ सुधार कवटी तोंडात ठेवून चघळावी.
आयुर्वेदिक प्रक्रिया :-
· नाका मध्ये एक एक थेंब तीळ ,खोबऱ्याचे तेल,तुप सकाळ-संध्याकाळ घालावे.
· एक चमचा तिळ तेल/एक चमचा खोबरेल तेल 2 ते 3 मिनिट तोंडा मध्ये घेऊन गुळण्या करुन थुंकावे.नंतर गरम पाण्याने तोंड धुवावे.
सामान्य उपाय योजना:-
· कमी तेलाचा आहार घ्यावा.हळद घातलेले दुध, काढा करुन पिणे (तुळस, मीरी, आद्रक, मनुका, दालचिनी)
· काळा चहा अद्रक व काळे मीठ घालून घ्यावा. कोल्ड्रींक्स, आईसक्रीम, वर्फयांचे सेवन टाळावे.
· अर्धा तास सक्तीची विश्रांती घ्यावी.
पावसाळा (वर्षाऋतु) घ्यावयाची काळजी:-
· अद्रकाचा वापर वाढवावा, चहा कॉफीत अद्रक वापरावे,काळा चहा अद्रकाचा काळे मिठ (पादेलोन) घालून घ्यावा.
· पाले भाज्या खाणे टाळावे,दिवसा झोपू नये.
वरील प्रमाणे आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वा नुसार सर्व नागरिकांनी अंमलबजावणी केल्यास आरोग्य चांगले राहून प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होईल, या साठी सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबाद यांनी आवाहन केले आहे.