चिंताजनक : उस्मानाबाद जिल्ह्यात १३ मार्च रोजी ५४ कोरोना रुग्णाची भर

जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या तीनशे पेक्षा जास्त 
 
चिंताजनक : उस्मानाबाद जिल्ह्यात १३ मार्च रोजी ५४ कोरोना रुग्णाची भर

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवार  दि. १३  मार्च रोजी नव्या ५४ कोरोना रुग्णाची भर पडली तर ३४  रुग्ण बरे होऊन घरी परतले.  त्यामुळे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ३०७  झाली आहे.जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या तीनशेपेक्षा जास्त गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे, याच पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यात उद्या  रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ७२१  रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १६ हजार ८२७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ५८७ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

सविस्तर रिपोर्ट पाहा  


 

From around the web