धक्कादायक : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील ८४ कैद्यांना कोरोनाची लागण 

मागील तीन दिवसात १३१ कैदी कोरोना पॉजिटीव्ह 
 
धक्कादायक : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील ८४ कैद्यांना कोरोनाची लागण

उस्मानाबाद -  कोरोना विषाणूंचा संसर्ग सर्वत्र मोठ्या प्रमाणात पसरत चालला आहे. या विषाणूने थेट पोलिसांच्या संरक्षणात बंदिस्त केलेल्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात प्रवेश केला असून तेथील चक्क ८४ कैद्यांना कोरोना विषाणूंने कवेत घेतले आहे. त्यामुळे बाहेरील वातावरणात न फिरणाऱ्या व न मिसळणाऱ्या कैद्यांना कोरोनाची लागण  झालीच कशी ? यावरून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दरम्यान, गेल्या तीन दिवसात १३१  कैदी कोरोना पॉजिटीव्ह आल्याचे सांगण्यात आले. 

उस्मानाबाद जिल्हा कारागृहाची एकूण क्षमता २६९ असून सध्या २७२ बंदी बंदिस्त आहेत, पैकी १३१ बंदींना कोरोनाची लागण झाली आहे. 

 कोरोना विषाणूंची बाधा झालेल्या रुग्णांपैकी दि.१६ मे रोजी ६८७ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ८६.२२ टक्के आहे. तर आज ९ व आजपर्यंत १ हजार ११४  रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृत्यू पावलेल्या रुग्णांचे प्रमाण २.२७ टक्के आहे. तसेच ४२ हजार १५५ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत.

जिल्ह्यातील ३९१ जणांची आरटीपीसीआर तपासणी करण्यासाठी स्वॅब येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात असणाऱ्या कोविड विषाणू तपासणी प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आले होते. तर ४७३ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून २१९ जण पॉझिटीव्ह व निगेटिव्ह २४८ जणांचा तर संदिग्ध ६ व ३९१ जणांचा अहवाल प्रलंबित आहे. तसेच १ हजार ४२३ जणांची रॅपिड ॲन्टिजेन तपासणी करण्यात आली असून त्यापैकी २७३ पॉझिटीव्ह व १ हजार १५० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

तसेच जिल्हाभरातील विविध रुग्णालयात ५ हजार ६८७ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत २ लाख ६० हजार ३७१ जणांची स्वॅब व रॅपिड ॲन्टिजेन तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ४८ हजार ९५६ जणांना कोरोना विषाणूंची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून पॉझिटीव रुग्णांचे प्रमाण ३७.९० टक्के आहे. आज आलेल्या अहवालानुसार स्वॅब, ॲन्टिजेन व एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे - उस्मानाबाद - १५०, ४६ (१९६), तुळजापूर - ११ - ५९ (७०), उमरगा- ४ - १६ (२०), लोहारा- २० - १० (३०), कळंब- १५ - २३ (३८), वाशी- १  - ५० (५१), भूम- ० - ३२ (३२) व परंडा- १८ - ३७ (५५) अशी एकूण २१९ - २७३ (४९२) रुग्ण संख्या आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील पथकाकडून उपचार सुरू

उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयातील १३० शिक्षाधीन कैदी व न्यायाधीन बंदींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यांच्यापैकी कोणालाच तीव्र स्वरुपाचे लक्षण न आढळल्यामुळे कारागृहातच उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान यासाठी जिल्हा रुग्णालयातील एक पथक नेमण्यात आले असून, त्यांच्या देखरेखीत उपचार सुरू आहेत.

गतवर्षीही जिल्हा कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. यावेळी त्यांची गेल्या तीन दिवसांमध्ये तपासणी करण्यात आली. कारागृहात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच प्रकोप केल्याचे समोर आले आहे. येथील शिक्षाधिन कैदी व न्यायाधिन बंदींची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. यामध्ये तब्बल १३० जणांना लागण झाल्याचे समोर आले आहे. यातील सर्वांची पुन्हा जिल्हा रुग्णालयातील पथकाने व्यक्तिगत तपासणी केली. तेव्हा त्यापैकी कोणालाच अधिक तीव्र स्वरुपाची लक्षणे आढळून आलेली नाहीत. यामुळे त्यांच्यावर आता कारागृहातच २४ तास देखरेख करण्यात येत आहे. पुढील काही दिवसांमध्ये यातील काहींना अधिक तीव्र स्वरुपाची लक्षणे आढळल्यास त्यांना जिल्हा रुग्णालयात आणून उपचार केले जाणार आहेत. दरम्यान, त्यांच्यावर पुढील काही दिवस जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात येणार आहेत

From around the web