राहुल गुप्ता यांनी घेतला बालविवाह निर्मुलनचा आढावा 

 
s

धाराशिव  - लहान वयात मुला- मुलींच्या लग्ने झाल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतात यावर आळा घाळण्यासाठी पोलीस विभाग, बाल संरक्षण विभाग तसेच शिक्षण विभागाने सजग आणि सर्तक राहणे आवश्यक आहे.प्रधानमंत्री  मातृवंदन योजनेसाठी अल्पव यीन लाभार्थीची नोंद झाल्यास बालविवाह प्रतिबंधक अधिनियमा अंतर्गत गुन्हा नोंद कारावा अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या. बालविवाह निर्मुलन जिल्हा कृती दलाच्या विशेष आढवा बैठकी प्रसंगी श्री. गुप्ता बोलत होते.

यावेळी    पोलीस विभागाचे पी आय गजानन घाडगे,  समाज कल्याण अधिकारी यांचे प्रतिनिधी अतुल जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के के मिटकरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस एच गोडभरले, डीपी ओ आय सी डी एस बी एच निपाणीकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक / माध्यमिक रत्नमाला गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी यासोद्दीन काझी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी एस व्ही अंकुश, सदस्य बालकल्याण समिती  मैना भोसले/ सुजाता माळी, कॉर्डिनेटर SBCसोनिया हंगे, SBC3 प्रतिनिधी नंदू जाधव, SBC3 सद्दाम शेख, परिवक्षा अधिकारी तथा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तथा जिल्हा बाल संरक्षण कक्ष अरविंद थोरात उपथित होते.

 श्री. गुप्ता म्हणाले बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सीएसबीने तयार केलेले संदेश आणि डिजाईन प्रत्येक ग्राम पंचायतीच्या इमारतीच्या भितीवर तसेच शाळा आंगणवाडया यांच्या भितीवर पेंटिग करुन घ्यावेत- जेणेकरुन सर्वांना हा संदेश  रोज पाहता येईल. ग्राम पंचायत विभागाने या कामास प्राधान्य देऊन काम सुरु करावे आपल्या गावामध्ये किंवा शहरामध्ये नातेवाईकांमध्ये बालविवाह होत आसल्याची माहिती मिळाल्यास त्याला आळा घालण्यासाठी पोलीस, प्रशासन महिला व बालविकास  शिक्षण यंत्रणेचीही मोठी जबाबदारी आहे. आशाताई अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून बालक- पालक यांचे समूपदेशन करावेत. ग्रामीण भागात बालविवाह होण्याचे जास्त प्रमाण आहे. ब-याच वेळी भीतीपोटी गावातील नागरिक पुढे येत नाहीत त्यामुळे प्रशासकीय यंत्राणेने सर्तक राहुन अशा गोष्टीना आळा घालावा असेही श्री. गुप्ता म्हणाले मुलींना शिक्षण, खेळ आणि कला क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा, विद्यालयापासून अंतरावर राहणा-या मुलींना सायकली वितरित करा सर्व शाळांमध्ये बालविवाह प्रतिबंध कायदया बाबत माहिती देऊन याची शपथ द्यावी असेही श्री. गुप्ता यावेळी म्हणाले.

From around the web