खा. ओमराजे यांचे गडकरी यांच्याकडे साकडे 

विविध मागण्यांचे निवेदन सादर 
 
d

उस्मानाबाद  - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या निधीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. 

            गडकरी  हे पंढरपुर येथे राज्यातील विविध पालखी मार्गांचे उद्घाटनासाठी आले असता उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रत्यक्ष भेट घेवून जिल्ह्यातील व लोकसभा मतदार संघातील विविध राष्ट्रीय महामार्गांच्या समस्या संदर्भात तसेच नविन महामार्गाची निर्मीतीकरीता पाठपुरावा केला . 

यावेळी खा. ओमराजे यांनी  खालील कामाच्या संदर्भामध्ये मंत्री महोदयांनी आश्वासन दिले असल्याचे कळविले आहे.

   अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 63 टेंभुर्णी-बार्शी-लातूर या मार्गाचे चौपदरीकरण करने संदर्भात मागणी करण्यात आली होती त्या संदर्भाने या राष्ट्रीय महामार्गाचे परावर्तन करणे अत्यंत गरजेचे व निकडीचे असल्याने हा महामार्ग झाल्यास मराठवाड्यातील उस्मानाबाद लातूर जिल्ह्यांचा बार्शीमार्गे पुणे-मुंबई थेट संपर्क होवून वेळ व पैसा यांची बचत होणार आहे.

            सोलापूर-उमरगा राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरील ओव्हरब्रीज सर्विस र्रोड, ड्रेनेजची अनेक कामे गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असल्याने सदर महामार्गावर या अपुर्ण  असलेल्या कामांमुळे अपघातांची संख्या वाढली आहे. तसेच अपुर्ण कामे असलेली ठिकाणे अपघात प्रवण क्षेत्र बनले असल्याचे खासदार यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणुन सदर कामाच्या तात्काळ पुर्ततेसाठी मंत्री महोदयांकडे पाठपुरावा केला आहे.

            उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर-उस्मानाबाद-वैराग-अनगर-रोपाळे-पंढरपूर ह्या संत गोरोबा काका महाराज पालखी मार्गाची मंजूरी मिळणेबाबत निवेदन दिले असून हा पालखी मार्ग विदर्भातील काही जिल्हे तसेच मराठवाड्यातील नांदेड-लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील भाविकांसाठी या महामार्गाची निर्मीती करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. तसेच बार्शी-तुळजापूर हा राज्यमार्ग तुळजापूर-नळदुर्ग-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग क्र. 652 या नव्याने घोषणा करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गास जोडण्याकरीता तसेच या महामार्गाचे चौपदरीकरण व दर्जोन्न करुन बार्शी सहित तुळजापूर नळदुर्ग-अक्कलकोट ही तिर्थक्षेत्रे राष्ट्रीय महामार्ग क्र. 652 जोडून नागरिकांची तसेच वेगवेगळ्या ठिकाणावरुन येणाऱ्या भक्तांची सोय होण्याकरीता पाठपुरावा करण्यात आला आहे. कळंब-इटकुर-पारा-वाशी-कुंथलगिरी प्रजिमा 15 (48 किमी) च्या कामासंदर्भात तसेच जैन धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या कुंथलगिरीपर्यंतच्या रस्त्याची दर्जा उन्नती करण्याच्या संदर्भात मागणी केली आहे.

             सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 व तुळजापूर-औसा राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 वरील उस्मानाबाद शहरानजीक वरुडा उड्डाणपुलावर स्ट्रेट लाईट, आयुर्वेदीक महाविद्यालयाजवळील उड्डाणपुलावरील स्ट्रीट लाईट तसेच जुना उपळा रोड येथे ओव्हरब्रीज उपळा उड्डाणपुलावर स्ट्रीट लाईट तसेच उस्मानाबाद शहरातील एम.आय.डी.सी ते इंजिनिअरींग कॉलेजपर्यंतच्या समस्या सर्विस रोड निर्मीतीबाबत व तुळजापूर-औसा राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 वरील विविध कामांच्या संदर्भात गडकरी यांच्याकडे निवेदन दिले.

         

From around the web