कोरोना : रुग्ण संख्या घटली , काळजी कायम !

 
कोरोना : रुग्ण संख्या घटली , काळजी कायम !

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. जिल्ह्यात सध्या २७१ रुग्ण उरले असून, बरे होण्याचे प्रमाण ९४.११ टक्के एवढे झाले आहे. लोकांनी नाकावर व तोंडावर मास्क/स्वच्छ रुमाल बांधणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, थर्मल स्कॅनिंग, वारंवार हात धुणे हे उपाय केले तर उस्मानाबाद जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होऊ शकतो. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार २५९ रुग्ण आढळून आले असून, पैकी १४ हजार ४४४ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात उपचाराखाली रुग्ण २७१ असून आतापर्यंत ५५४ रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. रुग्णाचे  बरे होण्याचे प्रमाण ९४.११ टक्के एवढे झाले आहे.मृत्युदर ३.६३ टक्के एवढा आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारपासून मंदिरे उघडली आहेत. तुळजापुरात महाराष्ट्र, कर्नाटक, कर्नाटक , आंध्रप्रदेश , तेलंगना राज्यासह अन्य भागातून मोठ्या संख्येने भाविक येतात. तसेच जिल्ह्यातील येरमाळा, अणदूर - नळदुर्ग मध्येही  भाविक येणार आहेत. त्यामुळे याठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करणे गरजेचे आहे. 
 
उस्मानाबाद कोरोना मीटर 

एकुण रुग्णसंख्या - १५२६९
बरे झालेले रुग्ण - १४४४४
उपचाराखालील रुग्ण - २७१
एकुण मृत्यु - ५५४ 

सविस्तर आकडेवारी पाहा  

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 15 नोव्हेंबर रोजी 38 पॉजिटीव्ह https://bit.ly/32OyNaG

Posted by Osmanabad Live on Sunday, November 15, 2020
 

From around the web