धाराशिव मध्ये एकास बेदम मारहाण
धाराशिव : आरोपी नामे-1)सम्राट गौतम कांबळे, 2) तथगत गौतम कांबळे, 3) गौतम धोंडीराम कांबळे, सर्व रा.बौध्दनगर उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.25.08.2023 रोजी 18.30 वा. सु. बौध्दनगर उस्मानाबाद येथे फिर्यादी नामे- दुशांत दिलीप बनसोडे, वय 36 वर्षे रा. बौध्दनगर उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांना नमुद आरोपीनी दारु पिवून येवून विनाकारण शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी कोयत्याने मारहाण करुन जखमी केले.तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी उध्दव लांडगे यांनी दि.26.08.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : आरोपी नामे- 1)सलमान शेख, रा. वासुदेव गल्ली, तुळजापूर ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी पाण्याची बॉटलचे पैसे मागीतल्याचे कारणावरुन दि.26.08.2023 रोजी 20.00 वा. सु.जयमातादी हॉटेल मध्ये तुळजापूर येथे फिर्यादी नामे- आकाश नाय्या स्वामी, वय 22 वर्षे, रा. छत्रपती नगर, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी आरोपीने पाण्याची बॉटल घेतलेले पैसे मागीतले असता नमुद आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काचेच्या ग्लासने डोक्यात मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. काचेच्या ग्लास फेकून देवून नुकसान केले. अशा मजकुराच्या आकाश स्वामी यांनी दि. 26.08.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 427, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देणाऱ्यावर गुन्हा दाखल
तुळजापूर : आरोपी नामे- अमीर महेबुब फकीर, रा. ताकविकी, ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.26.08.2023 रोजी 17.30 वा.सु. हंगरगा पाटी येथे पिकअप क्र एमएच 05 बीएच 5630 मध्ये क्षेमतेपेक्षा जास्त तिन मोठे खोंड पिकअपसह अंदाजे 2,40,000₹ किंमतीचे जनावरे दाटीवाटीने भरुन वाहतुक करत असताना फिर्यादी नामे- रोहीत राजेंद्र बागल वय 21 वर्षे, रा. सांगवी मार्डी ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद मिळून आले. अशा मजकुराच्या फिर्यादी रोहीत राजेंद्र बागल यांनी दि.26.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे प्राण्यांना निर्दयपणे वागणूक कायदा कलम 11 (1)(के) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधि 5, 5 (ए), 5 (बी) (ई) सह मो.वाका 83, 177 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.