लाच घेताना ढोकीच्या दोन सपोनिना पकडले

उस्मानाबाद – गैर अर्जदार यांच्यावर कडक कारवाई   करण्यासाठी  ४२ हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या ढोकी पोलीस स्टेशनच्या दोन कारभाऱ्यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून त्याच पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

बेंबळी पोलीस स्टेशनमधील एका पोलीस उपनिरीक्षकास लाच घेताना नुकतेच पकडण्यात आले होते. त्याची शाई वाळते न वाळते तोच ढोकीच्या दोन लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांना पकडण्यात आले आहे.
तक्रारदार यांच्या पत्नीने ढोकी पोलीस स्टेशनमध्ये  एनसी दाखल केली असून, गैर अर्जदार यांच्यावर कडक कारवाई   करण्यासाठी ढोकी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धनसिंग जाधव यांनी ४० हजार तर सहायक पोलीस उप निरीक्षक जोतीराम गणपत कवठे यांनी २  हजार लाचेची मागणी केली, या प्रकरणी  एसीबी पथकाने खात्री केली आणि  सापळा रचून रंगेहात पकडले. याप्रकरणी   ढोकी पोलीस स्टेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक विनय बहिर हे करत आहेत.

admin

Read Previous

अखेर वाळुच्या टिप्पर चोरी प्रकरणी गुन्हा दाखल !

Read Next

उस्मानाबादच्या पोलीस खात्याला लाचखोरीची कीड !