आचारसंहिता भंगाचे दोन गुन्हे दाखल

उस्मानाबाद – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले आहेत.  आचार संहितेची कडक अंमलबजावणी सुरु झाल्याने सर्वच राजकीय पक्ष जेरीस आले आहेत.

उसमानाबाद :- दिनांक 16.03.2019 रोजी सकाळी 09.25 वा.सु. पोस्ट ऑफिस उस्मानाबाद येथे पोस्ट मास्टर पोस्ट ऑफिस उस्मानाबाद यांनी मुख्य पोस्ट ऑफिस उस्मानाबाद येथे पोस्ट आणि पासपोर्ट कार्यालय येथील कोनशिला झाकण्यात न आल्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला आहे. म्हणून संतोष आण्णासाहेब गायकवाड उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 आचारसंहिता कक्ष उस्मानाबाद यांचे फिर्यादवरून पोस्ट मास्टर पोस्ट ऑफिस उस्मानाबाद यांचे विरुध्द दिनांक 16.03.2019 रोजी पोलीस स्टेशन उस्मानाबाद शहर येथे भादंविचे कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

उमरगा :- दिनांक 10.03.2019 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 च्या अनुषंगाने भारत निवडणुक आयोग यांची आदर्श आचार संहिता 2019 अंमलात आणण्याचे आदेश पारित झाले असताना अमित रामलिंग राऊत सुशिक्षीत बेरोजगार अभियंता रा.घर क्र. 163 सुयोग निवास बार्शी रोड चौधरी नगर लातुर यांनी दिनांक 11.03.2019 रोजी 10.30 ते दिनांक 14.03.2019 रोजीचे 15.05 वा.दरम्यान शिवपुरी रोड ते कांबळे यांचे घर रामनगर इथपर्यंत उमरगा येथे सिमेंट कॉक्रीटचे काम चालू करुन आदर्श आचार संहिता 2019 च्या नियमांचा भंग केला आहे. म्हणून बालासाहेब दत्तात्रय कानडे प्र.कार्यालयीन अधीक्षक नगर पालिका उमरगा यांचे फिर्यादवरून अमित रामलिंग राऊत यांचे विरुध्द दिनांक 15.03.2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

admin

Read Previous

उस्मानाबादच्या पोलीस खात्याला लाचखोरीची कीड !

Read Next

‘त्या’ शिक्षकांवरील कारवाई प्रलंबित !