अखेर वाळुच्या टिप्पर चोरी प्रकरणी गुन्हा दाखल !

दोषी पोलिसांवर कोणती कारवाई होणार

नळदुर्ग :- नळदुर्ग पोलिसांनी पकडलेला टिप्पर चालकाने रातोरात पळवून नेला होता, उस्मानाबाद लाइव्हच्या बातमीनंतर अखेर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नळदुर्ग पोलिसांनी बुधवारी रात्री वाळूने भरलेला टिप्पर पकडला होता, त्यानंतर तो टिप्पर इटकळ औट पोस्ट मध्ये लावण्यात आला होता, मात्र चालकाने तो रातोरात पळवून नेला होता, तत्पूर्वी या प्रकरणी तोडपाणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता .

हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र उस्मानाबाद लाइव्हने हे प्रकरण चव्हाट्यावर आणताच पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

गुन्ह्यात काय म्हटले ?

दिनांक 14.03.2019 रोजी 05.00 ते 09.00 वा.चे दरम्यान दुरक्षेत्र ईटकळ येथे 1) शंकर धोंडीबा पवार रा. केशेगाव तांडा 2) टिप्परचा मालक यांनी दुरक्षेत्र इटकळ आवारात लावलेला नंबर नसलेला टिप्पर ज्याचा चे.सी. क्र. एमएटी 44905335010696 किं.अं. 15,00,000/-रु. अंदाजे पाच ब्रास वाळु किं.अं. 80,000/-रु असा एकुण 15,80,000/- रु. चा माल चोरुन नेला आहे म्हणून 1) शंकर धोंडीबा पवार रा. केशेगाव तांडा 2) टिप्परचा मालक यांचे विरुध्द दिनांक 14.03.2019 रोजी पोलीस स्टेशन नळदुर्ग येथे भादंविचे कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांवर कोणती कारवाई होणार ?
पोलिसांच्या ताब्यात असलेला टिप्पर चालकाने पळवून नेला खरा, पण त्याची हिम्मत झाली कशी ? त्याने टिप्पर पळवून नेला की पळवून नेण्यास मदत करण्यात आली ? याची संपूर्ण चौकशी करून दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

#उस्मानाबाद लाइव्हचा दणका

admin

Read Previous

उस्मानाबादच्या उमेदवारीचा सस्पेंस कायम ! दादा की ताई ?

Read Next

लाच घेताना ढोकीच्या दोन सपोनिना पकडले