टाकळी (बेंबळी परिसरात रानडुक्करांचा हैदोस

उस्मानाबाद – तालुक्यातील टाकळी (बेंबळी ) परिसरातील शेतात रान डुक्करांनी हैदोस घातला आहे. या परिसरातील शेतकरी काकाजी धनाजी सोनटक्के यांचे पाऊण एकरातील टोमॅटोचे  रानडुक्करांनी प्रचंड नुकसान केले आहे.
काकाजी सोनटक्के यांना केवळ चार एकर शेती असून, पैकी पाऊण एकर मध्ये एक लाख खर्च करून टोमॅटो लागवड केली होती, त्यातून 3 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते, मात्र रानडुक्करामुळे टोमॅटोची वाट लागली आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे, शेतकरी उण्यापुऱ्या पाण्यावर भाजीपाल्याचे उत्पन्न घेत असताना, रानडुक्करामुळे आता त्रस्त झाले आहेत.

admin

Read Previous

या ‘नगरा’ला लागुनिया, सुंदर ती दुसरी दुनिया…

Read Next

उस्मानाबादच्या उमेदवारीचा सस्पेंस कायम ! दादा की ताई ?