शिवसेनेने ओम राजेंना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादीकडून राणा पाटील

उस्मानाबाद – शिवसेनेची उमेदवारी विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना जवळपास निश्चित आहे, मात्र  शिवसेनेने माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यास  राष्ट्रवादीकडून स्वत: विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे वृत्त आहे.


शिवसेनेच्या उमेदवारीवरून  सध्या रस्सीखेच सुरु आहे. शिवसेनेचे उपनेते आमदार तानाजी सावंत यांनी, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. ओमराजेंचा सर्व खर्च मी करतो, असे त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले पण पक्षप्रमुखांनी एकतर तुम्ही स्वतः निवडणूक लढवा किंवा विद्यमान खासदार गायकवाड यांना निवडून आणा, असे बजावल्याचे कळते.

एकंदरीत रागरंग पाहता, स्वतः तानाजी सावंत निवडणूक लढवण्यास इच्छूक नाहीत. त्यामुळे गायकवाड यांची उमेदवारी निश्चित समजली जाते. जर सावंतांच्या आग्रहामुळे सेनेची उमेदवारी ओमराजेंना मिळाल्यास  राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार राणा जगजितसिंह उमेदवार राहतील, असे सांगितले जात आहे. मात्र गायकवाड कायम राहिल्यास  राष्ट्रवादीकडून सौ. अर्चनाताई पाटील याच उमेदवार राहतील, हे जवळपास निश्चित आहे.

शरद पवार यांचा  राणा पाटलांना  आग्रह
माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांना वयोमानामुळे निवडणूक लढवणे शक्य नसल्याने  उस्मानाबादसाठी उमेदवार कोण द्यायचा यावरून  राष्टवादीमध्ये  पेचप्रसंग निर्माण झाला आहे. उद्योजक अशोक जगदाळे, विक्रम काळे हे स्वतः इच्छूक असले तरी, राणा पाटील हे त्यांना उमेदवारी द्यायला तयार नाहीत. बार्शीचे दिलीप सोपल स्वतःहून इच्छूक नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांचे नाव आघाडीवर  आहे. मात्र शरद पवार हे राणा पाटील यांना तुम्ही स्वतः निवडणूक लढवा असा आग्रह धरत आहेत. मात्र सेनेचा उमेदवार कोण राहील,हे  पाहून राणा पाटील आपला निर्णय जाहीर करणार आहेत., असे  राष्ट्रवादीच्या  गोटातून सांगण्यात आले.

admin

Read Previous

उस्मानाबाद | लोकसभा निवडणूक | असा असेल निवडणूक कार्यक्रम

Read Next

या ‘नगरा’ला लागुनिया, सुंदर ती दुसरी दुनिया…