रवी सरांना इरोध !

भावड्या – जय महाराष्ट्र पक्या !

पक्या – जय महाराष्ट्र ! काय म्हणतंय लोकसभेचं इलेक्शन ?

भावड्या – तुक्याची राष्ट्रवादी जोमात तर आमची सेना कोमात दिसतेय गड्या …

पक्या – ऑ ? ते कसं काय ?

भावड्या – आरं रवी सरांना लोकांचा तर इरोध हाईच अनं त्यात सेना नेत्यानी सुद्धा इरोध केलाय !

पक्या – ऑ ? कोण कोण इरोध केलाय ?

भावड्या – सावंत साहेब, ओम दादा , बोरकर तात्या या समद्यांनी इरोध दर्शविला बघ …

पक्या – पण परंड्याच्या तात्यांनी तर जोरदार समर्थन दिलंय म्हण की …

भावड्या – आता तात्याचं सेनेत चालतंय व्हय ?

पक्या – पण उद्धव साहेब पाठीशी असताना शेवटी इरोधक तर काय करणार ?

भावड्या – तेबी बरुबर हाय म्हण … पण धाकधूक सुरु हाय…

पक्या – म्या तर ऐकलंय रवी सराचं तिकीट फिक्स हाय …

भावड्या – आरं सावंत साहेब लईच तासून हाईत … म्हणतात , रवी सरांना तिकीट दिलं तर सेनेची सीट गेली म्हणून समजा …

पक्या – आरं, ते असं का म्हणून म्हणत्यात ?

भावड्या – त्यांचा सगळा जीव ओम दादावर… ओम दादाला तिकीट द्या म्हणतात…..

पक्या – मागच्या येळी ओम दादाला तिकीट घे म्हटलं तर नको म्हणाले अन आता गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्यात व्हय ?

भावड्या – यामुळेच त्यांचं तेल गेलं, तूप गेलं , हाती धुपाटणं आलं … अशी अवस्था झाली बघ…

पक्या – ओम दादांनी मागच्या येळी हातची संधी घालवली बघ , नाय तर ओम दादा खासदार अन सुधीर आण्णा आमदार राहिलें असते बघ..

भावड्या – आता सुधीर आण्णा बीजेपीत गेलेत… त्यांचा तर रवी सरांना कट्टर इरोध हाय …

पक्या – मग रं ?

भावड्या – यामुळेच तर रवी सरांचं काय खरं नाय गड्या …

पक्या – उद्धव साहेबानी दम दिला की, लागतील कि सगळे कामाला ?

भावड्या – मोठे साहेब असताना येगळं व्हतं,,, आता लईच येगळं हाय… बोलतो नंतर.. येतो मी..

पक्या – आरं भावड्या, फिप्टी – फिप्टी च्या तर घेऊ …

भावड्या – नको आता , मला रवी सराकडे जायचं हाय.. भेटतो नंतर ….

लेखन

सुनील ढेपे

9420477111

admin

Read Previous

लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात

Read Next

उस्मानाबाद | लोकसभा निवडणूक | असा असेल निवडणूक कार्यक्रम