चार गावचा पाणी प्रश्न पेटला

उस्मानाबाद – तेर, ढोकी , कसबे तडवळे आणि येडशी गावाच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी या चार गावातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यानी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. महावितरणच्या थकीत बिलाची रक्कम भरण्यास  जिल्हा परिषदेचे पदाधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 तेर,ढोकी, कसबे तडवळे आणि येडशी  या चार गावाला पूर्वी तेरणा धरणातून पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र काही वर्षांपूर्वी वीज बिल थकल्यामुळे या गावचा पाणी पूरवठा बंद झाला. त्यानंतर अनेक ठिकाणी पाईप लाईन चोरीला गेली तर काही ठिकाणी पाईप गांजले आहेत. तसेच विद्युत मोटारी जळाल्या आहेत.

या गावाला सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी राज्य सरकारने ४ कोटी ४१ लाख रुपये मंजूर केले असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ने वर्क ऑर्डर मंजूर केली आहे. मात्र  लाईट बिलाचे सहा लाख रुपये  जिल्हा परिषदेकडे पडून असून ते भरत नसल्यामुळे कामाला सुरुवात होत नाही, असा आरोप उपोषणकर्त्यानी केला आहे.

  •  तेर,ढोकी, कसबे तडवळे आणि येडशी  या चार गावचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न सुटण्यासाठी आपणच राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता.त्यामुळेच ४ कोटी ४१ लाख निधी मंजूर झाला. वीज बिल भरून पाणी पुरवठा सुरु होणार नाही तर त्यासाठी दुरुस्ती करावी लागेल आणि या कामाची वर्क ऑर्डर निघाली आहे.  श्रेय मिळू नये म्हणून केवळ राजकारण केले जात आहे. 
    – अर्चनाताई पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष

admin

Read Previous

उमरगा – हाणामारी प्रकरणी चार पोलीस निलंबित

Read Next

चार गावचा पाणी प्रश्न पेटला