हाणामारी प्रकरणी चार पोलीस निलंबीत

उमरगा –  उमरगा पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी चार पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
दिनांक 02.03.2019 रोजी रात्री  राजुदास सिताराम राठोड वय 35 वर्षे पोलीस नाईक , नेमणूक पोलीस ठाणे उमरगा हे पोलीस स्टेशन आवारातील उत्तर बिट रुम मध्ये काम करत असताना त्यांचे व यातील आरोपींचे मोबाईल फोनवरून झालेल्या वादावरुन आरोपी पोलीस नामे 1) लाखन सुभाष गायकवाड पोलीस हवालदार 2) मयुर राजाराम बेले पोलीस शिपाई 3) सिध्देश्वर प्रकाश शिंदे पोलीस शिपाई सर्व नेमणुक पोलीस ठाणे , उमरगा व लाखन गायकवाड यांचा खाजगी ड्रायव्हर गणेश साहेबराव कांबळे वय 35 वर्षे रा. एस.टी.कॉलनी उमरगा यांनी संगणमत करुन फिर्यादी राजुदास सिताराम राठोड यास मारहान करुन जखमी केले व शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली तसेच राजुदास राठोड यांच्या रुम मधील टेबल , खुर्च्या , कॉम्प्युटरचे नुकसान केले व गुन्हयाचे कागदपत्र अस्ताव्यस्त टाकून दिले आहेत. वगैरे मजकुरचा राजुदास सिताराम राठोड यांचा एम.एल.सी. जबाब पोलीस उपनिरीक्षक वाघ यांनी पोलीस स्टेशन उमरगा येथे दाखल केल्याने वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 02.03.2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 324,323,504,506,34,427 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्हयामध्ये वरिल सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

            या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी चौकशी करुन अहवाल सादर केला आहे. सदर प्रकरणातील फिर्यादी व आरोपी हे पोलीस कर्मचारी असुन त्यांना कायदयाची व पोलीस खात्याच्या शिस्तीची संपुर्ण माहिती असताना देखील त्यांनी कर्तव्यात अत्यंत बेशिस्त व बेजबाबदार पणाचे वर्तन करुन पोलीस खात्याची प्रतिमा मलिन केली आहे.  म्हणून पोलीस नाईक राजुदास सिताराम राठोड, लाखन सुभाष गायकवाड, मयुर राजाराम बेले, सिध्देश्वर प्रकाश शिंदे सर्व नेमणूक पोलीस स्टेशन , उमरगा यांना मा.श्री आर.राजा पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांनी एका कार्यालयीन आदेशाद्वारे दिनांक 02.03.2019 रोजी शासकिय सेवेतून निलंबित केले आहे.

admin

Read Previous

सोसायटीच्या साठ बनावट सदस्यांचे सभासादत्व रद्द

Read Next

उस्मानाबाद येथे महिलेची फसवणूक