सासरच्या त्रासास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

आंबी :- 1) मारोती भिमराव देवकर (नवरा) 2) धोंडाजी देवकर (दिर) , सासु, व जाऊ सर्व रा. बोधडी ता.किनवट जि.नांदेड 3) गणेश धोत्रे (नंदावा) व ननंद दोघे रा. धानोरा ता.किनवट जि.नांदेड -यांनी संगणमत करुन विवाहित महिला सखुबाई मारुती देवकर रा.बोधडी ता.किनवट जि.नांदेड (मयत) हीस किरकोळ कारणावरून व नवऱ्याने दारु पिवुन त्रास देवुन छळ केल्याने सखुबाई मारुती देवकर यांना नातेवाईकांचा त्रास असहाय्य झाल्याने त्यांचे त्रासाला कंटाळुन सखुबाई मारुती देवकर यांनी दिनांक 01.03.2019 रोजी 14.30 वा.सु. पाणीपुरवठा विहीर रत्नापूर ता.परंडा येथे विहीरीत उडी मारुन बुडून आत्महत्या केली आहे. म्हणून सखुबाई मारुती देवकर यांची आई रुक्मीणबाई मारुती पवार यांचे फिर्यादवरून वरिल आरोपीतांविरुध्द दिनांक 02.03.2019 रोजी पोलीस स्टेशन आंबी येथे भादंविचे कलम 306,323,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

admin

Read Previous

काळया बाजारात विक्रीसाठी जाणारा तांदुळ पकडला

Read Next

दावणीला चारा मिळेना ! शेतकरी हताश !!